पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १७ दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी यांनी गायकवाडाची दिवाणगिरी पतकरग्यांत कांहीं चूक केली की काय ? याविषयीं विचार. आतां दादाभाईच्या संबंधानें कांही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सन १८७३च्या डिसेंबर महिन्यापासून ते बडोद्याच्या दरबारचा राज्यकारभार पाहू लागले. त्यानंतर त्यांस लौकरच कळून आले होतें कीं, कर्नल फेर आपणास अनुकूल नाहीत. देशीराजाच्या दरबारांतील रेसिडेंट जर दिवाणास अनुकूल नसेल तर तो किती जरी शाहणा असला तरी त्याच्याच्यानें राज्यकारभार करितां येणार ना हों, असा आमचे मनाचा दृढनिश्चय आहे. कारण सत्तेपुढे काहीं शहाण नाहीं. त्यांत कर्नल फेर सारख्या रेसिडेंटाच्या कारकिर्दीत तर ही गोष्ट सुतराम कठीण. कर्नल फेर यांची नुसती दादाभाईस प्रतिकूलता होती, इतकेच नाहीं पण राज्यांतील सरदार व शिलेदार बोक राजाचें अन्न खाऊन त्यांचे अगदीं प्रति. पक्षी बनून बसले होते आणि रेसिडेंटाच्या हिमायतीने प्रजा इतकी अनावर झाली होती की रेसिडेंटाची नेक नजर असल्यावांचून तीस आळा घालून राज्यकारभार चालविणे हें कोणास ही शक्य नव्हते. अशा अडचणींत दादाभाई यांस मल्हारराव महाराज जर पूर्णपणे अनुकूल असते तर आह्मी घटकाभर असे कबूल करतों कीं, दादाभाई यांनी बडोद्याचा कारभार सुयंत्र चालविला असता; परंतु त्यांची देखील त्यांस अ नुकूलता नव्हती. दादाभाई यांनी दिवाणगिरीची वस्त्रे विधिपूर्वक स्वीकारिळी त्या- पूर्वी त्यांस शेकडों अनुभव आले होते कीं, राजा आपणास अगदीं अनावर आहे, आणि त्यांच्या विचारास स्थैर्य ह्मणून मुळींच नाहीं. त्यांस स्मरत असेलच कीं, म हाराजांनी त्यांस आरंभी असा एक दस्ताऐवज लिहून दिला होता कीं, मी तुमच्या विचाराप्रमाणे वागेन. हा दस्ताऐवज त्यांच्या हातांत देऊन पावघटका झाली नाहीं तो त्या क्षणिक बुद्धिच्या राजाच्या मनांत असें आलें कीं, आपण आतां अगदीं पर- तंब झालों, ते सांगतील तसे आपणांस वागावे लागेल ह्मणून त्यांनीं पहाण्यासाठीं तो दस्ताऐवज परत मागविला, आणि लागलीच फाडून टाकिला. आणि मग दादा- भाई यांचे जवळ येऊन त्यांचें असें समाधान केलें कीं, मी तुमचे विचाराप्रमाणे वा गण्यास तयार आहे, तेथें दस्ताऐवजाचें काय प्रयोजन आहे? दादाभाई यांनी ही शांतपणे महाराजांस बरें वाटेल असे उत्तर दिलें. त्यावेळेस त्यांच्या मनास काय वा टळे असेल तें उघडच आहे. पण त्यावेळची त्यांची शांत आणि आनंदित मुद्रा