पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१४९) लेला न्याय तोच ईश्वराचा न्याय आणि ह्मणूनंच 'पंचमुखी परमेश्वर' असे नांव पडलें आहे. त्याच्या न्यायाचा उपयोग एकदेशीय नसून, सार्वकालिक, सार्वजनि- क, आणि सार्वत्रिक असा आहे, तस्मात मल्हारराव यांनी केवळ आपल्या आचर- णानेच आपले राज्यपद गमावळे, किंवा एखाद्या शहाण्या राजास देखील आपले राज्यपद राखून ठेवणें दुर्घट झाले होतें, अशा काही विलक्षण गोष्ठी घडून आल्या होया, याचा निवाडा करण्याचे काम जगाचे असून त्याचा भावी उपयोग फार मो- ठा आहे. कर्नल फेर यांच्या संबंधानें जितकें लिहावे तितकें थोडेंच. लिहितां सरस्वतीच्या सरतिल शतकलद सदृश भववती । अर्से त्यांचें अगाध चरित्र आहे. ते लिहिणारांनीं लिहावें तरी कोठवर ! या भागाचा उपसंहार करितांना येवढे ह्मणणें भाग येतें कीं, राज्यांतील सर्वांहून श्रेष्ठ अधिकाऱ्याचे मुख्य चातुर्थ काय तें हेंच आहे कीं, अधिकारावर जो मनुष्य नेमावयाचा तो फार सावधगिरीने नेमला पाहिजे. त्यांत चूक झाली कीं येथून तेथून सर्वत्र घोंटाळा व्हावयाचा. घड्याळांतील एखादे यंत्र बिघडल्याने जसें तें सर्व निरूपयोगीं होतें, तसेंच राज्यकारभारांत एक मनुष्य जर भलत्याच ठिकाणी नेमिला गेला, तर त्यापासून फारच अव्यवस्था होते. लार्ड नॉर्थब्रूकसाहेब यांनी मल्हारराव महाराजांविषयीं शांति, क्षमा, दया, आणि नयनैपुण्य इत्यादि अत्युत्तम गुणांचें त्यां- घ्या आचरणांत प्रदर्शन केले होते, तसें सर फिलिप उड्हौस यांनी करून महारा- जांविषयीं कारुण्य स्वीकारिलें असते तर त्यांना योग्य रेसिडेंटाची बडोद्याच्या दरबा. रांत नेमणूक करून मल्हारराव महाराज यांजमध्ये राज्यकारभार चालविण्या इतकी योग्यता आणिली असती यांत कांहीं संशय नाहीं. मनुष्यप्राणी हा स्वतः सिद्ध चां- गळा बनलेला आहेच. त्याजमध्ये जे आगंतुक वाईट गुण शिरतात ते काढून टा कळे म्हणजे त्यांचा चांगुलपणा कायम असतो.