पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वगैरे बहुतेक महाल यांच्याचकडे होते. खुद्द राजाबरोबर कामकाजाचा हे विशेष संबंध ठेवीत यामुळे गोविंदराव रोडे यांचें मन यांच्याविषयीं शुद्ध नवतें; तथापि त्यांची त्यांस परवा नसे. भाऊ शिंदे दिवाण झाल्यानंतर बळवंतराव येशवंत यांस नवसरीस सुभे मिलें होतें, मुख्य अधिकारी मिले. भाऊ शिंदे यांचे व या उभयतां बंधूंचे पूर्वीपासूनच वैमनस्य असे, आणि भाऊ शिंद्याचा कारभारी लल्लू आशाराम याच्या गैर वर्तनाविषयी त्याणी खंडेराव महाराजांची खात्री करून देऊन लल्लूभाई यांजला जेव्हां जमीनदोस्त केले तेव्हांपासून तर तो वैराग्नि विशेष भाऊ खेडकराप्रमाणेच हे उभयतां बंधु माझे आनेष्टेच्छु आहेत अशी भाऊ शिंदे याणीं खंडेराव महाराजांची समजूत पाडली होती, यामुळे कांहीं देण्याघे- ण्याची सबब पुढे करून खंडेराव महाराजानी त्यांस कामावरून दूर केले होतें, व त्याजवर त्यांचे घरीं पाहारा ठेविला होता. भडकला. मल्हारराव महाराज बडोद्यास आल्यावर हे त्रिवर्गही प्रतिबंधांतून मुक्त झाले, परंतु कांहीं महिनेपर्यंत त्यांची कामावर नेमणूक झाली नव्हती. भाऊ खेडकर यांस फडणिसाच्या कारभाराखेरीज दुसरे कोणतेही काम नको होतें. फडणिसाच्या आणि भाऊच्यामध्ये तर मनस्वी वांकडे आले होते म्हणून फडणिसांच्या इच्छेविरुद्ध भाऊ यांस फडणिसाचा कामदार नेमावा हे मल्हारराव महाराज यांस प्रशस्त वाटले नाही, यामुळे ही गोष्ट कांहीं दिवसपर्यंत लांबली होती, परंतु सालमन साहेब यांच्या शिफारशीपुढे मल्हारराव महाराज निरुपाय होऊन त्याणी भाऊ यांस फडणिसाच्या कामदाराचा अधिकार दिला, परंतु येणेकरून भाऊ याणी आपल्यास मोठा कलंक लावून घेतला व त्यांजकडे तो अधिकार आल्यानंतर त्याणी आपल्या यजमानाची व त्यांच्या कारकुनांची वेळोवेळी जी अप्रतिष्टा केली तेणेंकरून तो कलंक त्याणी वज्रलेप केला. हल्लींचे फडणीस माधवराव रामचंद्र ऊर्फ दादा साहेब यांचे वडील यांचे वेळेस गणेशपंत भाऊ त्यांचे कारभारी होते त्याणीही आपल्या यजमानास अशाच रीतीने वागविले होते असे लोक म्हणतात. तोच कित्ता भाऊ खेडकर याणी उचलला होता. परंतु तात्या साहेब हे स्वतः काम करण्यास योग्य नव्हते यामुळे त्यांस आपल्या कारभाऱ्याच्या' आधीन राहावे लागले होतें, आणि सयाजीराव महाराज यांची गणेशपंत भाऊ यांजवर पूर्ण मेहेरबानी होती, व दिवाण न नेमितां महाराज यांस स्वतः कारभार करावयाचा होता त्यास गणेशपंत भाऊ उत्तम साधन होतें, यामुळे तात्या साहेब यांचा कांहीं इलाजही नव्हता, परंतु ती गोष्ट दादा साहेब यांस लागू नव्हती; कारण त्यांच्या आंगी स्वतः फडणिशीचें काम करण्याची शक्ति होती, आणि जोपर्यंत ते स्वतः फडणिशीचे काम योग्य रीतीने चालावेतील तोपर्यंत त्यांच्या कारभान्याची नेमणूक सरकारानी करणे कोण- त्याही रीतीने न्याय्य नव्हते. बळवंतराव येशवंत यांस महाराजानी फौजदारीचे मुख्य अधिकारी नेमून नानाजी येशवंत यांस न्यायाधीश नेमिलें. एकाचे दोन शत्रु परस्पर मित्र होतात, ही गोष्ट वर लिहि- लेल्या त्रिवर्ग कामदारांस बरोबर लागू पडते. हे त्रिवर्ग आणि सालमन साहेब हे भाऊ