पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4 भाग ५. कारभारी मंडळीमध्यें फेरबदल. हरीबा गायकवाड यांच्या दिवाणागरीचा शेवट-गोपाळराव यांस महाराजानी आपले दिवाण नेमिलें-भाऊ खेडकर, बळवंतराव येशवंत, आणि नानाजी येशवंत यांच्या नेमणुका. हरीबा गायकवाड यांची दिवाणगिरी तीन महिन्यांतच संपली. यावरून त्यांस रेसिडेंट साहेब अनुकूळ नव्हते असे दिसते. निंबाजीदादा ढवळे यांजपेक्षां हरीबा गायकवाड यांस राज्याची माहिती ज्यास्त होती, व त्याणी सात वर्षेपर्यंत महालानीहाय सरसुभ्याचे काम केले होतें; तथापि दिवाणगिरीचे हुद्यास ते लायक नव्हते. हरीवा यांचा काट असा होता कीं, दरबारांत दुसरे कोणाचा पाय शिरूं देऊं नये; परंतु तो त्यांचा बेत सिद्धीस गेला नाहीं, आणि गोपाळराव मैराळ बडोद्यांतील प्रख्यात सावकार यांस महाराजांनी चैत्र शुद्ध १ संवत १९२७ रोजी पोषाख देऊन आपले दिवाण नेमिलें, राज्यांत मोठमोठी कामें केलेले व अनुभवी असे बडोद्याच्या दरबारांत जे गृहस्थ होते त्यांपैकी तिघे, गोपाळराव मराळ दिवाण झाल्यावर लागलीच मोठमोठ्या कामावर नेमिले ते:- आनंदराव लक्ष्मण उयांस भाऊ खेडकर म्हणतात हे खंडेराव महाराज यांचे अमलांत फडणिसाचे कारभारी होते. राज्यांतील सर्व कामाचा संबंध फडणिशी दफतराशी असे. यामुळे फडणिसाचा कारभारी तर दिवाणाचा केवळ सव्य बाहु असे. बडोद्यांतील प्रसिद्ध दिवाण गणेश सदाशिव ओझे हे सयाजीराव महाराज यांच्या अमलांत फडणिसाचे कारभारी होते, यामुळे सर्व सूत्र त्यांच्याच हात असे. गोविंदराव पांडुरंग रोडे यांच्या दिवाणगिरीत भाऊ खेडकर यांचे दरबारांत चांगले वजन असे, व बडोद्याचे राजधानीत गणेश रघुनाथ अकोलकर म्हणून एक मोठा विलक्षण कारस्थानी व शहाणा पुरुष होता त्याच्या मेहेरबानीने खंडेराव महाराज यांचीही भाऊवर मेहेरबानी होती. गोविंदराव रोडे यांजविषयों खंडेराव महाराज यांचे मनांत विषम भाव आणण्यांत मुख्य काय ते गणपतराव बापूच होते. त्यावरून भाऊ खेडकर हेही त्या मसलतींत असतील असा तर्क करण्यास लोकांस जागा होती. गोविंदराव रोडे पदभ्रष्ट झाल्यावर भाऊ शिंदे दिवाण झाले. त्यांचें व भाऊ खेडकर यांचे बनले नाहीं. भाऊ शिंदे यांजवर असिस्टंट रोसेडेंट सालमन साहेब यांस लांच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आला होता त्यांत भाऊ खेडकर यांचे कांहीं कारस्थान होते असे म्हणतात, आणि यामुळेच खंडेराव महाराज यांची भाऊ खेडकर यांजवर इतराजी होऊन त्यांस कामावरून दूर केले होतें, व मकरपुऱ्यास नजर कैदेत ठेविले होतें. दुसरे बळवंतराव येशवंत व तिसरे त्यांचे बंधु नानाजी येशवंत यांणीही खंडेराव महाराज यांचे अमलांत मोठया अधिकाराची कामे केली होती. उत्तर प्रांतांतील कडीपट्टण