पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्याचा देखील कोणाच्यानें छळ करवणार नाहीं, तसा छळ इंग्रज सरकारांबरोबर ज्या राज्यघराण्याची मैत्री निष्कलंक चालत आ ली होती, त्या राज्य घराण्यांतील राजाचा एका पाजी मनुष्यानें कीं हो केला ! ! आणि त्याबद्दल त्यास कांहीं शासन झालें नाहीं ! ज्या मानधन राजाला आपल्या दरबारांत देखील ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीच्या डावे बाजूस बसणें आवडलें ना- हीं, त्यावर अप्रतिष्ठेचे पर्वत कीं हो कोसळले ! पांडु हा वाईट चालीचा मनुष्य आहे, त्यास खोटया फिर्यादी करण्याची लत पडली आहे, नगर जिल्ह्यांतील पोलिसच्या अधिकाऱ्यांस त्याची चाल माहीत आहे, इतक्या गोष्टी मुंबई सरकारांस कळल्यावर देखील त्यांनी कर्नल फेर यांस महाराजांच्या लग्न समारंभास जाण्याची मनाई केली, हें यथोचित केलें काय ? म ल्हारराव महाराज हे वीस लक्ष प्रजेचे स्वामी ही गोष्ट ध्यानांत धरून जे कांहीं के- लें पाहिजे होतें, तें कर्नल फेर यांजकडून घडलें नाहीं, पण मुंबई सरकारांकडून देखीळ घडलें नाहीं. असे असतां राज्याला विपत् वृक्षाचें बीज काय ते मल्हारराव महाराज अशी जी लोकांची समजूत झाली आहे तीत गैर समजुतीचा भाग फार आहे. टकरसाहेब यांनी एक लांब मिनिट लिहून कर्नल फेर यांची पराकाष्ठेची स्तुती केली आहे, व मल्हारराव महाराज यांच्या दरबारांतील कामदार लोकांची कर्णकटु शब्दांनी अत्यंत निंदा केली आहे, ह्मणून काय झालें? यांनी एकच बाजू पाहिली होती. आपल्या रेसिडेंटामध्ये कोणते दुर्गुण होते, आणि आपण कोणत्या चुका केल्या होत्या, त्यांजकडे त्यांनी लक्षच दिलें नाहीं. यावरून लॉर्ड नॉर्थब्रूकसाहेबां सारखे मोठे आणि निर्मळ मनाचे ते नव्हते, हे स्पष्टच आहे. नाही तर कर्नल फेर यांच्या मोठमोठ्या चुकांवर देखील त्यानी आच्छादन घालावें कां ? आपल्यास दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत. आणि आपल्यापु जीं प्रमाणे आहेत त्यांवरून योग्य निर्णय केला पाहिजे. मल्हारराव महाराज यांचे वाईट आचरण जर आपण छपवीत नाही, तर त्यांच्या संबंधानें ज्यांनी अयथोचित आचरण केळें त्याबद्दल त्यांस दोष देतांना आपणास भय कशाचें ? आणि खरी गोष्ट जगास कळवितांना आपण कां मागें सरावें? गत गोष्टीत चांगले वाईट काय होते याविषयीं वाटाघाट करण्यांत अर्थ काय? हें ह्मणणे चुकीचे आहे. जनांनी केलेल्या न्यायापासून विद्यमान काळी काही अर्थ - निष्पत्ती होणार नाहीं, हें खरें आहे. व आज त्यांनी अमुक एक न्याय केला ह्मणून होऊन गेलेल्या गोष्ठींत कांहीं फेर बदल होणार नाहीं. आयुष्याचा अंत होईपर्यंत मल्हारराव महाराज डॉक्टर सीवर्ड यांच्या जाचात असावयाचेच, व त्यांच्या राज्य- कारभारांतील पुढारी मंडळी अनुपपत्तींत आयुष्याचा शेवट होईपर्यंत राहावयाची आणि कर्नल फेर यांचा व राज्यकारभारांतील नव्या मंडळीचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हा- वयाचाच. पण जनांनी केलेल्या न्यायाचें आयुष्य फार दीर्घ आहे आणि त्यांनी के