पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१४७) आणि माझें राज्य बुडालें तरी बेहेत्तर आहे, पण त्या द्वेष्टया रेसिडेंटाचें कांहीं एक ऐकावयाचें नाहीं, असा दृढनिश्चय करून बसत. आणि कामदारलोकांस ह्मणत की, ते माझा इतका छळ करीत असतां तुमच्याच्याने मला वारंवार त्यांच्या सल्यानें चाळा, झणजे तुमचें राज्य सुरक्षित राहील, असे सांगवतें तरी कसें ? आणि मी ऐ- कावें तरी कसें ? श्रीमंत सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांच्या लग्न संबंधानें महाराज यांची थोडी कां.. अप्रतिष्ठा झाली ? व कर्नल फेर यांनी त्या कामांत थोडाका अविचार केला होता! त्या बाईबरोबर लग्न करणें महाराजांस उचित असो अगर नसो, राजकीय कामाशीं तर त्या गोष्टीचा कांहीं संबंध नव्हता ना! व त्यांनी कोणाची बायको आपल्या घरां तं घालून तीजबरोबर तर लग्न लाविले नव्हतेना? ज्या कन्येबरोबर महाराजांनी गांधर्वविवाह करून तीस आपली बायको केली होती, ती माझी बायको आहे, असा अनेक दुष्ट कृत्ये करून प्रख्यातीत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यांतील एका पांडु नांवाच्या पाजी मनुष्यानें, बेधडक दावा केला, हे त्यास कोणाचें पाठबळ असल्या वांचून कां ? महाराज यांस रेसिडेंटसाहेब यांची योग्य रीतीची अनुकूलता असती तर, अशा छुच्चया मनुष्यास बडोद्याकडे तोंड करण्याचें तरी धैय झाले असते काय? पांडूच्या फिर्यादीच्या संबंधाने मल्हारराव महाराज काय काय खटपटी करीत. होते याविषयीं कर्नल फेर यांनी बारीक बातमी ठेविली होती. व आपल्या भरंवशाचे हेर कामास लाविले होते. व त्यांजकडून ज्या बातम्या मिळत त्या ते सुरतेचे मा. जित्रेट होपसाहेब यांस कळवीत होते, असे होपसाहेब यांच्या लेखावरून दृष्टोत्पत्ती.. स आले आहे. पांडु यानें आपली फिर्याद खरी करावी यासाठी पुष्कळ लबाडी केली होती, व खोदे साक्षी उभे केले होते, याविषयों अहंमदनगरच्या माजिस्त्रेटाच्या लेखावरून स्पष्ट झाले आहे, पण या संबंधानें कर्नल फेर यांनीं बातनी ठेवून पांडुप्या लबाडीबद्दल सुरतेच्या माजि-- स्त्रटांस अथवा दुसऱ्या कोणास कांहीं दखील लिहिलें नाहीं. तर पांडुविषयीं त्यांचा इतका पक्षपात कां ? आणि मल्हारराव महाराज यांजविषयों इतका द्वेष कां ? कर्नल फेर हे मल्हारराव महाराज यांच्या विरुद्ध पक्षाचेच कैवारी को असावेत ? पांडु यास तूं खोटी फिर्याद कर, आम्ही तुला अनुकूल आहोत, असे स्पष्टपणे सांगितलें तरच त्यास उत्तेजन देऊन पाठबळ दिले असें ह्मणावयाचें; किंवा त्याची बाजू जितकी. संभाळवेल तितकी संभाळण्याचा यत्न केला ह्मणजे उत्तेजन दिल्याचें व पाठबळ दिल्याचे श्रय येतें, याविषयीं लोकांच्या ध्यानांस येईल तें खरें. ग्रंथकर्त्यानें खरी हकीकत त्यांपुढे ठेवावी, हे त्याचें काम आहे. पांडुच्या फिर्यादीबद्दल गायकवाड काय खटपट करितात, याचा शोध ठेवणें हें कांहीं रोसडेंटाचें काम नव्हते; त्यां च्या सरकारांनी त्यांस तसा हुकूम दिला नव्हता, व पांडु यानें ही त्यांस वकील पल दिले नव्हते. असे असतां, कर्नल फेर यांनी आपल्या अधिकाराचा गैर रीतीनें उ पयोग केला.