पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कर्नल शार्ट साहेब यांजकडे जात, आणि माझ्या वरिष्ट अदालतीत काम कसे चा- तें तें पाहा, असें ह्मणून ते फैसले त्यांस मोठ्या आनंदानें दाखवीत असत. ह्या गोष्टी कांहीं सामान्य प्रशंसनीय नव्हत्या. कर्नल फेर रेसिडेंट झाल्यावर मात्र असें चांगलें एकही कृत्य महाराजांच्या हातून घडले नाहीं. दिवसानुदिवस वाईट माल जास्त होऊं लागले. याचे कारण विचारी मनुष्यांस सहज समजावयाजोगे आहे. ज्यास किंचित् अपकार सहन होत नाहीं, आणि सहजरीत्या जो चिरडीस जातो, अशा मनुष्यास जर वारंवार आपण अपकार करूं लागलों तर कधींही ताळ्यावर पे- णार नाहीं. त्याजबरोबर आपण शांतवृत्तीनेच वागळे पाहिजे; व त्याच्या मनोवृत्तीस थोडासा मार्ग देऊन त्या हळू हळू मर्यादेंत आणिल्या पाहिजेत. कर्नल शार्ट साहेब यांनी विद्याखात्याकडे महाराजांचे मन वळविल्यामुळे, त्या संबंधाने हवा तितका खर्च करण्यास महाराज उत्सुक होते. कर्नल फेर यांनी महाराजांकडून असे एक देखील चांगले कृत्य करवून घेतले नाहीं, ते रेसिडेंट झाल्यावर महाराजांची वृत्ती उलटी वाईट होत चालली, आणि त्यांस त्यांचा अतिक्रम अगदी सहन होईनासा झाला. रेसिडेंट साहेब यांजमध्यें सद्विचार फारसा नसल्यामुळे, त्यांच्याकडे जो कोणी जाईंल, त्यांचा ते पक्ष धरून बसत, आणि त्यांनी कोणाचा पक्ष धरिला ह्मणजे महाराज त्या मनुष्याचा जास्त वास करीत असत. उभयतांमध्यें सख्य संबंध घडवून आणण्याकरितां कामदार लोकांनी व्यूह रचा वा, आणि तो एकाएकी विसकटून जावा, यांत सर्व दोष मल्हारराव महाराजांचाच मव्हता. कर्नल फेर यांजवर त्यांनी भरवंसा ठेवावा, व ते आपले हितेच्छु आहेत असे मानावें असे त्यांचे एक देखील कृत्य नव्हते. व त्यांच्या सल्याने चालल्यानें महाराजांचा व राज्याचा फायदा होईल, अशी सला देण्याची देखील त्यांची योग्यता नव्हती. त्यांची सला ह्मटली ह्मणजे हा कीं, विजापूरच्या ठाकूर लोकांवरील आपली हुकमत महाराजांनीं सोडून द्यावी. शिले- दार लोकांच्या नेमणुका चालविण्याबद्दल सरदार लोकांची जामिनकी कबूल करावी, आणि त्यांच्या चरितार्थासाठींच इंग्रजसरकारांनी रॉबर्टव्या रिसाल्या- बद्दल तीन लाख रुपये सूट दिली असे मान्य करून, ती रकम त्यांच्याच खर्चाकडे लावावी. सावळी आणि खैराळु हे दोन परगणे नबाबसाहेब आणि डोसुमिया यां च्या जहागिरीचे असें कबूल करावें, आणि कर्नल फेर यांच्या कृपेंतील अर्जदार जो दावा करील तो मान्य करावा. असे केले असते तर कर्नल फेर साहेब कदाचित् महाराज यांजवर मेहेरबान झाले असते. पण त्या गोष्टी कबूल करण्यासारिख्या न व्हत्या. तथापि दरबारचे कामदार लोक तसे करण्याविषयीं देखील महाराजांस सला देत होते. त्यांस असें वाटत होतें कीं, कर्नल फेर यांस वश करून घेतल्यावर त्यां- घ्या चुका त्यांच्याच पदरांत बालून दुरुस्ती करता येईल. महाराजही तसे करण्या विषयीं तत्पर होत. पण ती गोष्ट अमलांत येण्यापूर्वी मध्येच त्यांस कर्नल फेर यां जकडून असा कांहीं अपकार होई कीं, त्यांच्या तळपायांची आग मस्तकास जाई