पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम, (१४५). लार्ड नॉर्थब्रुक यांच्या दरबारास गेला नाहीं. व सर फिलिपू उडहीस यांचा 'त्याने सत्कार केला नाहीं, येवढी मात्र त्यांजकडून चूक झाली होती. पण त्या सं- बंधाने त्यांचे म्हणणे अगदीं रास्त होतें. आतां कालमानाकडे त्याने लक्ष दिले नव्हते हैं खरें परंतु तेणेकरून त्यानीं आपणास गव्हरनर साहेब यांच्या कृपेस अ- पात्र करून घेतले नव्हतें. गायकवाडाच्याच इतिहास दृष्ट्या पाहिलें असतां, मुंबई सरकारांनी मल्हारराव महाराजाशी जसें वर्तन केले तसे त्यांच्या पूर्वजांशीं माजी अधिकान्यांपैकी कोणीही केले नव्हते. मुंबई इलाख्याच्या माजी गवरनराची सयाजीराव महाराजांवर काहीं थोडी इतराजी झाली नव्हती; परंतु त्यांचे अंतःकरण पवित्र असल्यामुळे प्रत्येक इ- तराजीचा शेवट गायकवाड सरकारांस हितकारक आणि सन्मानास्पदच झाला. त्या- प्रमाणें सर फिलिप् उडहौस यांच्या कारकिर्दीत कर्नल फेर रोसडेंट झाल्यावर म- म्हारराव महाराज यार्शी एकाही कामांत वागणूक झाली होती असे प्रमाणच सांप. डत नाहीं. जेणेकरून महाराजांचा पाण उतारा व्हावा, त्यांजवर त्यांच्या सरदारांस व रयतेस किर्याद करण्याचे उत्तेजन यावें, रेसिडेंटाचे कानीं लागून महाराजांबद्दल खोट्या खोट्या चहाड्या सांगून आपले महत्व वाढविण्याची हलक्या लोकांस स खंड सांपडावी, आणि रयतेनें आज्ञाभंजक व्हावें, अशा प्रकारची पुष्कळ कृत्यें माल घडून आळी आहेत. "महाराजांनी राज्यसत्व हातांत घेतल्या बरोबर त्यांनी खंडेराव महाराज यांच्या मंडळीवर तीव्र शस्त्र धरिलें होतें खरें, परंतु ते कर्तव्यकर्म संपल्यावर ते अगदी शांत झाले होते. बळवंतराव राहुरकर यांच्या नायब दिवाणागिरींत त्यांनी कोणताही अ न्याय केला नाहीं, व दुसऱ्यास करूं दिला नाहीं. एका कामात नानासाहेब खा- नवेलकर यानें वरिष्ठ अदालतीचा हुकूम मान्य केला होता, त्याबद्दल त्यांनी त्यांस इतकी तंबी दिली होती कीं, नानासाहेब खानवेलकर यांस असे वाटलें कीं, आतां आपले काय होतें कोण जाणे. महाराज गादीवर आल्या- नंतर त्यांनी धर्मादाय जमिनीवरील कर माफ केला, देवस्थान धर्मादायाच्या नेमणुका, आणि ब्राह्मणांची वर्षासने बंद होतीं तीं मोकळी केलीं, वतनदार लोकांच्या वतना घरील जप्तचा उठावण्याविषयीं हुकूम केला, वेदशास्त्राच्या आणि दुसऱ्या शाळा स्थापन केल्या, आणि वरिष्ठ अदालत स्थापन करून, न्यायाची व्यवस्था उत्तम प्रकारची केली होती. वरिष्ट अदालतींतून एका मोकदम्याचा फैसला झाला होता तो फिरवावा झणून हरलेला पक्षकार पुष्कळ नजराणा देण्यास राजी झाला होता, व त्याने परा- काष्ठेचा प्रयत्न केला, व मोठमोठ्या शिफारसीही आणिल्या, परंतु महाराजांनीं तिकडे लक्ष दिलें नाहीं. वरिष्ठ कोर्टात न्याय कसा होतो, व काम कसे चालते, हैं पाहण्याकडे ते बराच वेळ घालवीत असत, आणि भारी मोकदम्यांचे फैसले घेऊन (मागील पृष्टावरील टीप), टकर साहेबांचे मिनिटावरील गुणागुणविवेचन पहा,