पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. महाराजांस अभिवचन दिले होतें तें कर्नल फेर यांनी खरें करून दाखविलें कीं काय ? कर्नल फेर यांनी रेसिडेंटीचा चार्ज तारीख १८ मार्च सन १८७३ रोजी घेत- ला. आणि तारीख २५ मार्च सन १८७३ रोजी मुंबईसरकारास रिपोर्ट केला. त्यां तील पांचवे कलमांत असे लिहिले होतें कीं, मजकडे निनावी अर्ध्या आल्या आहेत, आणि त्या वाचून मीं मजजवळ ठेविल्या आहेत. त्याविषयीं गवरनरसाहेब यांस अचं- बा वाटवयासारखें कहीं नाहीं.- ह्या लेखाचा भाव काय ? हे स्पष्ट आहेच. चार्ज घेऊन सात दिवस झालें नाहींत तोच मी लोकांच्या अर्ध्या घेण्याची सुरुवात केली आहे, असें फेर साहेब यांनी मुंबईसरकारांस कळावेलें आणि ते त्यांनी ऐकून घेतलें. कर्नल फेर यास चासपुत पहावयाचे होतें कीं, आपढ़ें करणें मुंबईसरका- रांस अभिमत आहे की नाही, आणि मुंबईसरकारांनी त्यांस निषेध केला नाहीं, तेव्हां ते समजले कीं, आपण जे करूं लागलो आहों तें मुंबई सरकारांस अभिमत आहे. यासच आह्मी मुंबई सरकारची गर्भित संमती ह्मणतो. मागील एका भागांत सांगण्यांत आलेच आहे कीं, पूर्वीच्या गवरनरांनी बडोद्या. च्या रेसिडेंटास सक्क हुकूम दिले होते की, 'तुझी गायकवाड सरकारच्या रययेच्या फिर्यादी ऐकू नये. जो कोणी फिर्यादी करण्यास तुम्हांकडे येईल त्यांस तुझी स्वतः सांगावें की, मला तुमच्या फिर्यादी ऐकण्याचा अधिकार नाहीं. महाराजांस सल्ला देण्याचा प्रसंग आला असतां तुझी त्यांचा अधिकार व मोठेपणा ध्यानांत धरून मोठ्या मुळाज्यानें त्यांचें मन न दुखवितां त्यास ज कांहीं सांगावयाचे असेल ते अ गदीं एकांती सांगावें आणि त्यांच्या प्रजे पुढे त्यांचा बोज कमी होईल असे कोण- तेही कृत्य करूं नये.

याप्रमाणे पूर्वीच्या गवरनरांनीं रेसिडेंटास कित्ता घालून दिला असतां त्याचा अ तिक्रम करून कर्नल फेर वागू लागले. तेव्हां मुंबई सरकारांनी त्यांस निषेध कां केला नाही? तहनाम्याअन्वयें गायकवाडाच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा इंग्रज सरकारांस मुळीच हक्क प्रात्प होत नाही. हे प्रमाणासह प्रतिपादन करण्यात आले आहेच झालेल्या कौल करारांत व स्थापित नियमांत फेर बदल करावयाचा होता, तर त्या बद्दल महाराजाशीं लखापढी करून महाराजांस का कळविलें नाहीं; कीं, आतां आमचा रेसिडेंट तुमच्या प्रजेच्या फिर्यादी ऐकेल. 'माझ्या प्रजेज्या फिर्यादी ऐक- ण्यास रेसिडेंट यांस अधिकार नाहीं.' अशा भ्रमांत कशासाठी ठोवले? व 'हाई 'सरकारामध्ये दोस्तीचा सीलशिका चालला आहे, तो वाढविण्याकडे मुख्यत्वें करून रोसडेंट साहेब यांचे लक्ष्य राहील.' असे मिथ्या अश्वासन त्या राजास कशासाठीं दिलें? हार्दू सरकारामध्ये दोस्ती वाढावी, असें कर्नल फेर त्यांच्या हातून एक तरी कृत्य घडलें होतें काय? असेल तर कोणी सांगावें! तसेंच मल्हारराव महाराज यांनी इंग्रज सरकारच्या दोस्तीत उणेरणा होईल, असें एक तरी कृत्य केले होते काय? फक्त माना पानाच्या संबंधानें तक्रार उपस्थित झाल्यामुळे तो अपमान भिरुराजा,