पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१४३ ) 'मल्हारराव महाराज यांच्या संबंधानें मुंबई सरकारचें वर्तन देखील पराकाष्ठेचे उदासीन, हेळसांडीचें आणि अपकारजनक होते, असे दिसून येतें. त्यांनी कर्नल फेर यांस बडोद्याचे रेसिडेट नेमिले, हें योग्य केले किंवा अयोग्य केळे येथूनच प्रश्नमालिका उपन्न होते. मल्हारराव महाराज यांजवरील त्यांची कृपा अगदीं सरली होती, ह्मणून किंवा महाराजांचें हित करावें या बुद्धीनें ही नेम णूक केली होती याविषयी विचार केला म्हणजे पुष्कळ प्रमाणांवरून असे स्पष्ट दि- सन येतें कीं, कर्नल फेर यांस रेसिडेंट नेमिर्ले तेव्हां मल्हारराव महाराज यांजवि पयों, त्यांच्या मनांत कृपेचा लेश देखील उरला नव्हता. कर्नल फेर सिंधमध्यें अ- सतां त्यांनी तेथें असेच कांहीं यथेष्टाचरण केले होते आणि त्याजवरून देशी राज्यांच्या दरबारांत वकिली करण्यास योग्य नाहींत अर्से ठरले होते असे विषम- योगाची चौकशी करण्याकरितां जें कमिशन बसले होते त्यांजपुढे तक्रार निघाली होती, ती खरी किंवा खोटी होती याचा निश्चय करण्याची आपल्यास गरज नाहीं. कर्नल फेर यांनी बडोद्याच्या दरबाराशी जें वर्तन केले त्या ताज्या पुराव्यावरून देशी राजा- चा दरबारांत ब्रिटिश सरकारचे रेसिडेंट नेमण्यांस तें पात नव्हते, असे स्पष्ट झाले आहे. नामदार लार्ड नार्थब्रूक तर असे स्पष्ट ह्मणतात कीं सर रिचर्ड मीडचें कमिशन नेमण्यापूर्वी देखील कर्नल फेर यांच्या समजदारीविषयीं, मन मिळाऊ स्वभावाविषयों, आणि ज्या गोष्टी त्यांस करावयाच्या होत्या त्यांच्या कदरदारीपणाविषयी आम्हांस पुष्कळ संशय होता. यावरून देशी राज्यांचा दरबारांतील रोसडेंटामध्ये जे गुण अवश्य पाहिजे होते, तें कर्नल फेर यांच्यामध्ये नव्हते हें स्पष्ट होतें. मुबईसरकार- च्या मनांत मल्हारराव महाराज यांचा व त्यांच्या राज्याचा तरणोपाय करण्याचा हो- ता तर अवश्य गुणविशिष्ट अशा एखाद्या सभ्य गृहस्थास बडोद्याचा रेसिडेंट ने- मावयाचा होता. राज्यकारभारांतील दोष बाहेर काढून राज्याचा बभरा करील अशा मनुष्याची निवड करणे योग्य नव्हतें. मुंबईसरकार नव्या रोसडेंटाची बडोद्याच्या दरबारांत नेमणूक करितात, तेव्हां महाराजास जो खलिता पाठविण्यांत येत असतो त्यांत शेवटीं असे एक कलम असतें कीं,:-' साहेब महसूफ इंज्यानेवाचे पूर्ण भरवशाचे आहेत, त्यास अबासाल त पन्हाचे दरबार व इंग्रजसरकार या दरम्यान जो दोस्तीचा सीलशिक्का चालत आला आहे, त्याची बढती करण्याकडे साहेब महसूफ यांचे मुख्यत्वेंकरून लक्ष राहील, अशी आमनियुलमकानानी खाली ठेवावी. यावरून देशी राजांच्या दर- बारांत आपला वकील ठेविण्याचा ब्रिटिश सरकारचा मुख्य उद्देश काय हें स्पष्ट होतें. कर्नल फेर यांस बडोद्यास रोसडेंट नमिले तेव्हां मुंबई सरकारांनी महाराजांस खळिता लिहिला त्यांत सदहूप्रमाणें कलम असेलच. तेव्हां आतां आपल्यास असे पाहिले पाहिजे कीं, ‘हार्दू सरकारांमध्ये जो दोस्तीचा सीळशिक्का चालत आला होता त्याची बढती करण्याकडे कर्नल फेर यांचें लक्ष राहील, असे मुंबईसरकारांनीं 6