पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. संपत्तीकडे ढुंकून देखील पाहिले नसतें, असे ते पवित्र मनाचे होते. परंतु मल्हार- राव महाराज यांच्या संबंधानें त्यांनी ज्या मार्गाचें अवलंबन केलें होतें, तो कोणत्याही दृष्टीने पाहिला असतां, सज्जनानुसरणशील होता, असें ह्मणतांच येत नाहीं. मग यांच्या मनांतील उद्देश सुष्ट असो किंवा दुष्ट असो. उद्देश चांगला असला ह्मणून कांहीं सदोष वर्तनाला चांगलेपणा येत नाही. आड मार्गाने जाणें सर्वथैव निंद्यच. मग जाणाराचा उद्देश कितीका चांगला असेना ? फिर्यादी चाळविणारानें खटला फार सामोपरितीने चालविला पाहिजे, हा सर्वमा न्य न्याय आहे. जें अपराध अपराध्यानें केले नाहीत, त्या अपराधांचा त्याजवर आरोप आणणे यास बालंट ह्मणतात. कर्नल फेर यांनी महाराजांवर जे आरोप. आणिले होते त्यांत कितीएकांस बालंटाची रूपें आलीं होतीं. जी गोष्ट खरी नाहीं असें त्यांस वाटत होतें, ती खरी आहे असे त्यांनी बुद्धिपुरःसर सांगितलें होते असे आह्मी ह्मणत नाहीं; परंतु लोकांच्या सांगण्यावर विश्वास किती ठेवावा याची तरी कांहीं मर्यादा आहे की नाहीं ? महाराज आपल्या जासुदास अक्कलकोटास पाठवि- तात यांत कांहीं राजकारस्थान आहे हे देखील त्यांनी खरें मानावें की काय ? बालंट आणण्याचे दोन प्रकार आहेत. एक अकसखोरी मनात धरून, आ णि दुसरा अविचारानें. कर्नल फेर यांनीं मल्हारराव महाराज यांजवर जे आरोप आणिले होते, त्यांत ज्यास बाळंटाची रुपें आली होतीं, ते दुसऱ्या वर्गातील होते. असें ही कबूल केलें तरी ज्याचा परिणाम वाईंट आणि घातक, तें कृत्य अकसखो. री मनांत धरून केलें नसेल, ह्मणून ते निरूपद्रवी आणि निर्दोष असें लोक मानीत नाहीत. ठ लोकांच्या मनांत वहीन भरविणें, भांडणे लावून वैराग्नी प्रज्वलित करणें, आणि ज्यांस आपण चहात नाही त्यांजावषयी लोकांच्या मनांत तिरस्कार आणि नावडते- पणा उत्पन्न करणे ही बालंटाची लक्षणे आहेत. अशा प्रकारची बाळंटें आण- ण्यांत किती नेट धरिलें होतें, आणि त्यापासून केवढे संकट ओढावलें होतें याजवर बालंट आणणाऱ्याच्या दोषाची किंमत करावी लागते. ब्रिटिश सरकारच्या मनांत वहीम उत्पन्न करण्याकरितां कर्नल फेर यांनी महारा- ज यांजवर राजद्रोहाचा आरोप आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. महाराज आणि सरदार, व शिळेदार लोक यांजमध्ये भांडणें लावून कसा वैरानी पेटविला होता हें या ग्रंथांत पुष्कळ ठिकाणीं निदर्शनास आणून दिले आहे. आणि महाराजांविषयीं सर्व लोकांच्या मनांत तिरस्कार आणि नावडतेपणा उत्पन्न करण्यांत त्यांनी कांही कसर ठेविली नव्हती हैं ही आपणांस पदोपदीं दिसून आले आहे. ‘अथ' पासून ' इति ' पर्यंत कर्नल फेर यांनी महाराजांच्या संबंधानें जें कांहीं केले त्यांत त्यांच्याविषयीं त्यांच्या मनांत कांहीं तरी करुणा होती असे कोणी एकही प्रमाण दाखवील तर कर्नल फेर यांस दोष दिले त्याबद्दलची चूक मोठ्या आनंदा ने पदरांत घेऊं, परंतु ही गोष्ट वंध्यापुत्रवत आहे.