पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१४१ ) डा होता. मुंबई सरकारांनी कर्नल फेर यांस लिहिलेल्या एका पत्तांत, काजी शा हबुद्दीन यांच्या लायकीविषयीं सुंदर उल्लेख केलेला होता. ते वाक्यच टिपेंत लिहि ले आहे. * तेच काजी शाहबुद्दीन ज्या प्रांतांत होते त्या प्रांतांतील तालुक्याच्या वहिवाटदारांनी पेंढाऱ्या प्रमाणे गांवेंचीं गांवें छुटलीं असतां, त्यावद्दल त्यांच्या फिर्यादी ऐकिल्या नाहींत, हें कर्नल फेर यांचे लिहिणे मुंबई सरकारास खरें वाटलें. यापे- क्षां विवेकभाव तो कोणता असावयाचा ? कर्नल फेर यांनी मल्हारराव महाराज यांजवर शेवटी राजद्रोहाचे बालंट आणण्या- चा देखील प्रयत्न केला. यांत त्यांनी महाराजांचा छळ करण्यांत पराकाष्ठा केली, हे कोणीही कबूल करील. आतां असा छळ करण्याचा त्यांचा हेतु तरी काय होता ? आणि मुंबई सर- कारांनी त्यांस इतका आश्रय कशासाठी दिला ? हो तवजिज्ञासा साह- जिक उत्पन्न होते. मल्हारराव महाराज यांच्या जुलुमापासून प्रजेची सुटका करावी आणि राज्य सुधारावें, हा त्यांचा मुख्य उद्देश होता, असे मानावें तर त्यास पुष्कळ अपवाद आहेत. दादाभाई नवरोजी यांस राज्यकारभाराचा अनुभव नसो. पण त्या सद्गृहस्था मध्ये दुसरा कोणता ही दोष नव्हता, ही गोष्ट अबालवृद्धांस मान्य आहे. त्यांचा कर्नल फेर यानी इतका द्वेष का केला ? रोसडेंट याची त्यांस अनुकूलता असती त र बडोद्याची राज्यव्यवस्था निटोप्यास आणण्यास ते असमर्थ होते की काय ? राजा सर टी माधवराव सारखे राज्यकर्ते त्यांच्या हाताखाली काम करण्यास उत्सुक हो- ते ते उगीच कां ? महाराजांचें आचरण चांगले नव्हते, सबव त्यांजविषयीं कर्न- ल फेर यांचें मन शुद्ध नव्हतें, हैं नीटच होतें, असे आपण घटकाभर कबूल करूं. पण राज्याविषयीं तरी त्यांचे मन कोठें पवित्र होतें? विजापूर ठाकुरास, महि काव्यांतील खंडणी देणाया तालुकदारांच्या वर्गात बसविण्यासाठी कर्नल फेर यां- नीं पराकाष्ठेचा यत्न केला यांत राष्ट्राच्या हक्काला अपाय होत नव्हता काय ? स डोद्याचे राज्यसूत्र इंग्रज सरकारांनी आपल्या हातात घ्यावें ह्मणून त्यांनी जो पराका- ष्ठेचा यत्न केला, तो स्वराज्यसत्तेस अपकारक नव्हता काय ? उत्कट महत्वाकांक्षा यावराज त्यांनी दुसरें कोणत्याही स्वार्थाची इच्छा केली नाही, हे आपण निर्मळपणानें कबूल केले पाहिजे. लार्ड क्लाईव्ह यांजपुढे मि रजाफरानें जशी आपली सर्व संपत्ति मांडली, त्याप्रमाणे मल्हारराव महाराज यांनी आपल्या संपत्तीचें सर्व भांडार त्यांस उघडून दिले असते तर, त्या शूर सरदाराने त्या

  • “ Mr. Dadabhai Nowrojee himself may be fairly open to the objection of being

inexperienced in matters of administration, but a very high opinion is entertained in many quarters of his character and abilities, while certainly in the case of Mr. Kazee Shahabudin there can be no lack of either qualities or experience. (Baroda Blue Book. No. 4 Page 25.)