पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ●आपल्या उजव्या बाजूस बसवीत असत. सर सी. मोर फिझिराल्ड जेव्हा म ल्हारराव महाराज यांच्या दरबारांत आले तेव्हां त्यांस समजलें कीं, आपल्यास राजाच्या डावे बाजूस बसावे लागतें. ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीचा हा अपमान आहे असे त्यांस वाटले, व अतःपर ही वहिवाट चालू द्यावयाची नाहीं असा त्यानी ठराव करून रेसिडेंट साहेब यांच्या द्वारे ती गोष्ट महाराजांस कळविली. ते आपल्या मिनि- टांत असे म्हणतात की, 'मी महाराजांच्या दरबारांत त्यांच्या उजव्या बाजूस बसलों.” आणि दरबारच्या रोजनिशींत असा दाखला आहे कीं, गवरनर साहेब सांप्रदायाप्रमाणे महाराज यांस आपल्या उजव्या हातास घेऊन बसले होते. महाराजांचें ह्मणणे असे होतें कीं, ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीनी माझ्या पूर्वजांला जो मान दिला होता तो मला द्यावा, आणि ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी यांचे म्हणणे असे पडले की, आमच्या दरबारांत आम्ही तुम्हास आमच्या उजवे बाजूस बसवून मान देतो तसा तुम्ही आम्हास तुमच्या दरबारांत द्यावा. (२०) ( मल्हारराव महाराज यांच्या पूर्वजांनी ज्या मानाचा एकसारखा शंभर वर्षे उपभोग घेतला होता तो मान मल्हारराव महाराज यांस न देण्याविषयी ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांचा निश्चय दुराग्रहाचा होता हें कारणासह पुढे सांगण्यांत येईल. येथे इतकेच सांगणे पुरे आहे की, महाराज यांच्या कारकीर्दीस आरंभ झाला नाहीं तोच त्यांनी गवरनर साहेब यांच्या सत्काराप्रीत्यर्थ हजारों रुपये खर्च करून जसें काय आपल्या विपद्दशेचे बीजारोपण करून घेतले. ( मागील पृष्ठावरून.) नर साहेबांस खाना दिला. त्याच्या पूर्वी अतषबाजीचें म्हणजे दारूकाम नामीं केलें होतें. पाह- वयास लोकांचे थवेचे थवे उभे होते. बाण, झाडें व कमाना करून त्याच्या आंत सुखाचें नवीन वर्ष अर्शी अक्षरें दारू उडवून लोकांस दाखविलीं. दारूकाम असें फारच थोड्या ठिकाणीं लो- कांनी पाहिले असेल. या गवरनर साहेबांनी दारूवरील प्रोफेसर गायकवाडाचा नौकर आहे त्यास खुषी झाल्याबद्दल साहेबांनीं प्रोफेसर यांस बोलून दाखविलें. बुधवारी हत्ती आणि गंड्याच्या टकरा साहे- बांनी पाहून त्याच दिवशीं कैलासवासी खंडेराव महाराज यांच्या राणीसाहेबांची भेट घेऊन व सकाळी महाराजांची खाजगी भेट घेऊन चार शब्द महाराजांस कळविले. मकरपुयास जाऊन इमारत पाहून त्याच दिवशों नेक नामदार गवरनर साहेब सर सी. मोर फिटझरल्ड व दुसरे साहेब लोक व नेटिवांपैकी मेहेरबान विनायकराव वासुदेव ओरिएंटल चान्सलेटर असे अमदाबादेस परत गेले, तेव्हां स्टेशनावर महाराज हे मंडळीसुद्धां पोंचवावयास गेले होते.