पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम- ( १३९) बाटदारानें त्यांजपासून अशा कबुलायती लिहून घेतल्या आहेत की, त्यांनी जमीन खेडूं नये आणि परगणा सोडून जावें. पाप्रमाणे आमच्यावर जुलूम झाला आहे. आम्ही कोठें जावें व काय करावें? कृपा करून आह्मांस राहण्यास जागा द्या. याब- द्दल जर तुझीं बंदोबस्त केला नाही तर ते आह्मांस. हांकून लावितील. आमच्या परगण्यांत पाऊस पडूं लागला आहे, ही लावणी करण्याची वेळ आहे, त्यांचा हेतु लाखो मनुष्यांस उपाशी मारावयाचा आहे. आणि आह्मांस व आमच्या कुटुंबांस मारून टाकून आह्मीं कमिशनापुढे फिर्यादी केल्याबद्दल आह्मांस. शासन करावयाचे. आहे. आह्मी आशा करितों कीं, तुझांस लाखो मनुष्याची दया: येईल आणि आमचे प्राण संरक्षण कराल. वडनगर परगण्यांतील एका गांवच्या लोकांच्या तर्फे ह्मणून जी अर्जी केली होती. तींत असा मजकूर होता कीं, आह्नीं तारीख १२ माहे मजकूर रोजी तुझांस आणि गायकवाडांचे रेविन्यू अधिकारी यांस अर्ज्या पाठविल्या. त्यांत हिलें होतें कीं, वडनगरचे वहिवाटदार वडनगरची आणि खैराळूची शिबंदी घेऊन मातःकाळीं आले. आणि गांवाळा घेरा घालून लूट केली; परंतु त्याबद्दल अद्याप कांहीं बंदोबस्त केला नाही. त्यानंतर त्याचप्रमाणे दुसरे एक गांव छुटलें. त्यांत तीन बायकांस तरवारीच्या जखमा केल्या, व दोन मनुष्यांस घोड्यापासून दुखापत झाली, आणि त्यारेवरीज पुष्कळ लोकांस मार मारला आहे. बीं आणि भांडीकुंडी वहिवाटदार घेऊन गेले.. जखमी लोकांपैकी एक मनुष्य वांचेल असा नाहीं. वहिवाटदार याने एका का- गदावर जरवमी लोकांच्या सह्या घेण्यासाठी त्यांच्या घरांत जाण्याचा प्रयत्न केला.. आणि त्यांस ज्यांनी हरकत केला त्यांस बिड्या घातल्या. या जुलुमाबद्दल आह्नों काजी शाहबुद्दीन, व हरिबा दादा, यांजपाशीं फिर्याद केली, पण त्यांनी काहीं चौ-- कशी केली नाहीं. आमच्या परगण्यांतील लोकांना तुझास अर्ध्या केल्या आहेत. त्यांस भय वाटतें कीं आली आपल्या हातांत कायदा घेतला असतां मोठा विलक्षण. परिणाम होईल. सबब ते शांत राहिले आहेत; परंतु त्यांच्यामध्ये काहीं मूर्ख लोक आहेत. त्यांस जर त्यांजवर जुलुम झाला याबद्दल न्याय मिळणार नाहीं तर ते प्रत्येक वस्तु लुटतील किंवा नासतील. पर्जन्य पडूं लागला आहे; परंतु वहिवाटदार लावणी करण्यास हुकूम देत नाहीं, यामुळे काय करावें हें आह्मांस सुचत नाही. गायकवाड आमचे फिर्यादीकडेस लक्ष देत नाहीत. आणि वहिवाटदार पेंढा याप्रमाणे आ- झांस लुटतात. ब्रिटिश सरकार जर आमचा सांभाळ करणार नाहीत, तर आह्मीं कोणाचा आश्रय करावा हें आह्मांस सुचत नाहीं. जर तुझी गायकवाडांस बंदो- बस्त करण्याविषयी कांहीं सला द्याल, तर पुष्कळांचे प्राण वांचतील नाहीं तर वहि- बाटदार आणि दुसरे उघड रीतीने आह्मांस लुटतील. खैराळू परगण्यांतील लोकांच्या तर्फे केलेल्या अर्जीतील तात्पर्य असें होतें कीं, खैराळूचा अव्वल कारकून दीडशें हत्यारबंद लोकांसह मोठी हिरनिपानी या गांवीं अगदीं पहांटेस आला. आणि वास वेढा घालून बायकामुळे घराबाहेर काढिलीं