पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ढेस ज्याप्रमाणे वाजवीपेक्षां फाजील रीतीनें लक्ष दिले जातें त्याचप्रमाणे हिंदुस्थानां तही प्रकार आहे असे दिसते. परंतु एकाद्या कामदाराकडे एकादें नाजूक काम सौंपवलें असून तें चोख रीतीनें बजावण्यास तो नालायक आहे असे उघड रीतीनें शाबीत झाल्यावर देखील त्याजकडे केवळ त्याच्या व्यक्तिमात्र हिताचा विचार क रून ते काम एक क्षणभर राहूं देणें हें कोणत्याही सरकाराच्या हातून होणार नाहीं. मुंबई सरकारच्या लिहिण्यावरून व कृतीवरून पाहतां प्रस्तुत प्रकरणाचें खरें महत्वच त्यास समजले नव्हतें असे ह्मणों मला माग पडतें. याप्रमाणे कर्नल फेर यांच्या योग्यतेविषय सहून श्रेष्ठ अधिकाऱ्यांच्या न्यायस मेत न्याय झाला. मुंबई सरकारांनी कर्नल फेर यांचा पक्ष धरून गवरनर जनरल यांजबरोबर वादविवाद करण्यांत व त्यांजकडून दुराग्रहानें तें प्रकरण स्टेट सेक्रेटरी- कडे नेवविण्यांत, आपणास गवरनर जनरल यांनीं शब्द लाविला त्यास आपण पात होतों असें दृढ करून घेऊन कर्नल फेर यांचा मात्र जास्त उपहास करविला. अ योग्य पक्षपाताचा हा नेमलेला परिणामच. कर्नल फेर यांच्या कारकीपूर्वी रोसडेंटाकडे फिर्याद कशी करावी हे बडोद्या- च्या रयतेस अगदर्दी कळत देखोळ नव्हते. त्यांची कारकीर्द सुरू झाल्यावर हे त्यांस नवें शिक्षण मिळालें. आणि सतत अभ्यासाने त्यांत ते दिवसानुदिवस ज्यास्त प्रवीण होत चाळले. कमिशन|पुढें ज्या फिर्यादी झाल्या त्यांत जुलुमानें रयतेपासून पैसा घे- तल्याबद्दल, व खुद महाराजांनी खंडेराव महाराज यांच्या कृपेतील मंडळीपैकी काही लोकांची घरे छुटून आणिल्याबद्दल फिर्यादी होत्या; परंतु महालचे कामदारां- नीं गांवचे गांव लुटून आणिले, व रयतेस गायकवाड सरकारच्या मुलुखांतून निघून जाण्याविषयी तसदी केली, व मोहोसमीच्या दिवसांत जमीन खंडण्याची मना केली, अशा जातीच्या फिर्यादी कमिशनापुढे आल्या होत्या असे आढळण्यांत येत नाही. त्या कमिशन गेल्यावर दादाभाईच्या दिवाणगिरींत रेसिडेंट यांजकडेस होऊ लागल्या. पट्टण, वडनगर, आणि खैराळू या परगण्यांतील कांहीं गांवच्या लोकांच्या तर्फे ह्मणून रेसिडेंट यांजकडे तीन अर्ध्या आल्या होत्या. त्यांपैकी दोन तारीख २३ मे सन १८७४च्या असून तिसरी तारीख २१ मेची आहे. या अर्ध्या त्या गांवच्या लोकांचे आह्मी वकील या नात्यानें कोणीं रेसिडेंट यांस दिल्या होत्या. पण त्यांची नांवें अथवा सत्या त्या अज्यवर नव्हत्या. त्या अर्ध्यातील मजकूर विशेषेकरून शब्दशः एकसारखा होता. पट्टण परगण्यांतील सर्व लोकांच्या तर्फे म्हणून जी अर्जी केली होती तींत असा मजकूर होता कीं, दहा दिवसांमांग पट्टणच्या वहिवाटदारानें दो- न कारकून रोमन पांडू या गांवीं पाठविले. त्या कारकुनांनीं बायकामुळे घराध्या बाहेर हांकून लावून घरांस मोहरा केल्या, आणि अफूच्या रसांनीं भरलेलीं मांडीं घे- ऊन गेले आणि लोकांचीं गुरेढोरें एक ठिकाणीं गोळा करून ठेविलीं. रयतेनीं त्यांस पूर्वी काय दिले त्याचा हिशेब दाखवीत नाहींत. काही लोकांस कैद करून बिड्या घातल्या आहेत. कांहीं गांवचे लोकांवर मोहसळ पाठविले आहेत, व वाहे-