पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१३५) आता आपल्यास येवढेच पहावयाचे उरलें आहे कीं, हे सगळे प्रकरण नामदार स्टेट सेक्रेटरी साहेब यांजपुढे गेल्यावर तेथें कोणाचा जय झाला, गवरनर जनरलचा की मुंबईसरकारचा, आणि कर्नल फेर रेसिडेन्सीच्या हुद्यास लायक ठरले किंवा गैरलायक ठरले ? नामदार स्टट सेक्रेटरी मार्किस सालिसबरी यांनीं * तारीख १५ एप्रिल सन १८७५ रोजी नामदार गवरनर जनरल कार्ड नार्थब्रूक यांस पत्र छि- हिले आहे त्यांतील तिसरे कलमांत कर्नल फेरविषयीं असे लिहिले आहे कीं, जें काम त्यांकडे सोपविलें होतें तें काम बजावण्यास ते लायक नव्हते, व हिंदुस्थान सरकारच्या हुकमाचा त्यांनी इतका अतिक्रम केला होता की त्याजबद्दल यरिका चेत देखील क्षमा करणे शक्य नव्हते. t चवथ्या कलमांत असे लिहिले आहे कीं, हुकुमाप्रमाणे वर्तणूक करण्य ज्या वेळेस त्यांची नावषी किंवा अशक्तपणा दिसून आला त्याच वेळेस त्यांस दूर कर ण्यांत आले असते तर. बडोद्याच्या गायकवाडाला कृपेने वागविण्याविषयीं महाराणी सरकारची इच्छा पूर्ण केल्याचे श्रय आलें असतें. पण तसे झालें नाहीं, याबद्दल त्यांस वाईट वाटतें. + सहाव्या व सातव्या कलमांत असे लिहिले आहे कीं, कर्नल फेर यांस टपका देणेच बस होतें, त्यांस अधिकारावरून काढण्याची जरूर नव्हती, अर्से ज्या कार- णावरून मुंबईसरकारास वाटले होते, त्या कारणासह त्याच वेळेस त्यांनी आपल्यास सर्व गोष्टी कळविल्या असंव्या तर त्यांजकडेस कांहीं दोष आळा नसता पण त्यांनी त्याप्रमाणें केलें नाहीं. झालेला पत्रव्यवहार आपल्याकडेस लागलींच पाठविला नाहीं. तो सहजरीत्या तीन महिन्यानंतर आपल्या नजरेपुढे आला ते.. व्हां आपल्यास सगळे समजलें. यास्तव महाराणी सरकारचा असा अभिप्राय आला आहे कीं, आपणास माहि- ती देण्याची जरूरी नव्हती, असे मानण्यांत मुंबई सरकारची गैर समजूत झाली होती. हें सर्व प्रकरण फारच महत्वाचें होते व गवरनर जनरल ह्यांस त्या प्रकर- णांत स्वतः हात घालण्याचा प्रसंग आला होता त्याजवरूनच ते अतिशय महत्वाचें

  • “ His character was little fitted for the delicate duties with which he had been

recently charged, and his departure from the orders he had received was too serious to be overlooked. ( Blue Book No. 4, Page 106.) t"It is to be regretted that his removal did not take place as soon as his indis- position or inability to shape his conduct according to his instructions was first made manifest. A fair trial would then have been given to the indulgent policy which Her Majesty's Government was anxious to pursue towards the Gaekwar of Baroda." (Blue Book No. 4, Page 106.) † “ To the decision, however, at which the Government of Bombay arrived, that it was expedient to censure Colonel Phayre, but not to remove him, no blame could have been attached if they had at once notified it, together with the circum- stances out of which it arose, to Your Excellency's Government. They did not do so. The correspondencc was not at once forwarded to you. It was only accidentally called for, and the proceedings which it recorded were for the first time brought to your knowledge nearly three months after they had occurred." ( Blue Book No. 4, Page 107)