पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लिहिले आहे. त्याच्या सहाव्या कलमांत ते असे ह्मणतात की ज्या राज्याच्या कारभा- रांतील अव्यवस्था उघडकीस आणण्यास कर्नल फेर यांचे जे गुण साधनीभूत झाले होते, ते गुण त्या राजास सलामसलत देणे या मोठ्या नाजुक कामास उपयुक्त न व्हते अशी आमची खातरजमा होती. सबब हा मार्ग आह्मीं पूर्वीच स्वीकारिला असता; आणि कर्नल फेर यांस आमच्या दरबारांतून काढावें अशी निक्षून वि- नंति करण्यास गायकवाडांस तरी त्याच गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत; आणि त्यांनी असेच ह्मटले होते की, कर्नल फेर आमचे कृतनिश्चित फिर्यादी आहेत. त्यां च्याने निष्पक्षपाती न्याय व्हावयाचा नाहीं. आणि त्यांनी आमच्याबरोबर जें वर्तन केले आहे, त्यावरून आमच्या शत्रूंस अशी आशा उत्पन्न झाली आहे कीं, रेसिडेंट साहेब आपणांस आश्रय देतील; यामुळे सुधारणूक करण्यांत अडचणी ज्यास्त वाढल्या आहेत. परंतु ज्या वेळेस आणि ज्या रीतीनें कर्नल फेर यांस काढण्यांत येतें, ती वेळ आणि रीत आह्मांस अभिमत नाही. यास्तव याबद्दल आमचे उलट अभिप्राय लिहून ठेवणे आम्हांस जरूर झाले आहे. आतां कर्नल फेर यांच्या गैरलायकीविषयों, आपणांस प्रमाणे पाहिजेत तरी को- णतीं? त्यांची पुस्तपन्हा करणार मुंबईसरकार त्यांस दिवाणाचे पूर्ण वैरी ह्मणाले. गवनर जनरलच्या मुख्य उद्देशास पराकाष्ठेचें विघ्न आणिल्याबद्दल त्यांनी त्यांस दोष दिला. दोष बाहेर काढणें या कामांत ते पूर्णपणे निपुण होते, परंतु राजास तशा नाजुक प्रसं गीं सलामसलत देण्याची त्यांजमध्ये अक्कल नव्हती, असा त्यांचा त्यांनी उपहास केला, आणि मल्हाराराव महाराज यांनी त्यांस आपल्या दरबारांतून काढण्याविषयीं जीं कारणे सांगितलीं होतीं तीं योग्य होतीं, असे कबूल केलें. आणि *तारीख १४ दिसेंबर सन १८७४ रोजी हिंदुस्थानसरकारास पत्र लिहिलें. त्यांतील दहाव्या कळमाच्या आरंभीच कर्नल फेर यांची वर्तणूक एककल्ली होती हे प्रसिद्ध होते असे लिहिलें आहे. इतक्या गोष्टी मुंबईसरकार यांनी स्वतः कबूल करून, त्यांस ज्या वेळे- स व ज्या रीतीने काढलें, तो रीत व वेळ आम्हास अभिमत नाही म्हणून त्याबद्दल असंमति लिहून ठेवण्यास तयार झाले. ह्यास ह्मणावें तरी काय ? कर्नल फेर यांस जर त्यावेळेसच काढावयाचें नव्हतें, तर त्यांस काढावयाचें तरी कोणत्या वेळेस होतें! मल्हारराव महाराज यांच्या राज्यपदाचा लय झाल्यावर की काय ? tempt to poison that officer, of which at least it may be said, without forestalling the result of any judicial investigation, that it could hardly have been prompted by other than political motives." (Blue Book No. 4, Page 89.)

  • “ The peculiarities of Colonel Phayre's personal character and of the position

in which he stood to the Gaekwar have been manifest throughout, and must have been as patent to the Government of India when they issued orders on the Commis- . sion's Report in July as they are now. " ( Blue Book No. 4, Page 89 )