पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. ( १३३ ) कर्नल फेर यांच्या संबंधानें मुंबईसरकारच्या वर्तनाविषयों आपण आणखी थोडा- सा विचार करूं. आतां असे करतांना कांहीं द्विरूक्ति होईल पण कर्नल फेर यांचा कैवार घेतांना आपण त्यास काय ह्मटले होते ते मुंबई सरकार विसरलें असे आप - ल्यास पुढील हकीगतीवरून समजेल.

तारीख २४ आगष्ट सन १८७४च्या पत्रांत मुंबईसरकारांनी त्यांस असे लि. हिलें होतें कीं, बडोद्याच्या राज्यकारभारांत सुधारणूक व्हावी हाच गवरनर जनरल यांचा मुख्य उद्देश असतां तुझी सरकारच्या हुकुमाकडेस अलक्ष करून दिवाणाचे पूर्ण वैरी होऊन बसलांत. आणि तसे करून तुमच्या व दिवाणाच्या मनःपूर्वक एका विचाराने राज्यकारभारांत जी सुधारणा व्हावयाची त्यांत पराकाष्ठेचे विघ्न आणिळेंत. मुंबईसरकारांनी वरील वाक्यांतील प्रत्येक शब्दानें कर्नल फेर बडोद्याच्या दर- बारांत राहूं देण्यास योग्य नव्हते, असें स्पष्टपणें उल्लिखित केले असता, त्यांनी ग वरनर जनरल यांजबरोबर असा वाद घातला कीं, त्यांस तुझीं भळत्याच वेळेस बडोद्यांतून काढिलें. गवरनर जनरल यांचा काय तो उद्देश राज्यकारभारांत सुधार, णूक व्हावी हा आणि तीही अठरा महिन्यांच्या अवधीत आणि त्या गोष्टीस कर्नछ फेर तर पराकाष्ठेचे प्रतिकूळ आणि त्यांस बडोद्याच्या दरबारांतून काढूं नये असा मुंबईसरकारचा पराकाष्ठेचा दुराग्रह; तेव्हां गवरनर जनरल यांच्या उद्देशाहून मुंबई- सरकारचा उद्देश भिन्न होता, असे सहज मानितां येईल. मग तो कोणता असेल तो असो. कर्नल फेर यांस टपका दिल्यावर ते वैरभाव सोडून देऊन राजाबरोबर व दि वाणाबरोबर मित्रभाव ठेवून, व त्यांस चांगली सलामसलत देऊन राज्यांत सुधार. णूक करण्याचा गवरनर जनरल यांचा इष्ट हेतु सिद्धसि नेतील, असे मुंबईसरका- रांनी मानिलें होतें. असे ह्मणावें तर त्यास त्यांच्याच लेखानें विरोध येतो. तारीख १४ दिसेंबर सन १८७४ रोजी त्यांनीं गवरनर जनरल यांस पत्र

  • 66

Wholly ignoring these instructions, you have placed yourself in a position of such decided hostility to the Dewan, whom the Gaekwar has appointed, as to impede most seriously the cordial co-operation of the Minister and yourself, in carrying out the administrative reforms which it is the sole object of the Government to induce His Highness to effect.” (Blue Book No. 4, Page 36.) ↑ “ His Excellency in Council would have taken this step, from the conviction that the very qualities which made Colonel Phayre an effective instrument for the ex- posure of the gross mismanagement of the Baroda State, were ill-adapted to the more delicate task of proffering advice to the Prince whose mal-practices he had dragged to light. The circumstances of the case enabled the Gackwar to claim, as he did on the 2nd November, the removal of Colonel Phayre, on the plea that he had been throughout his determined prosecutor, that he could not therefore exercise impartial judgment, and that the difficulties of reforming the administration were increased by the hopes of support from the Resident, which the Prince's enemies founded on their knowledge of the part Colonel Phayre had played towards the Durbar, But it is against the time and manner now chosen by the Government of India for Colonel Phayre's removal that His Excellency in Council feels bound to record his respectful protest. This removal follows closely upon the receipt of a Khurita from the Gaekwar praying that Colonel Phayre may be re-called, and upon an at-