पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. द्देशाने जातात असे ह्मणणें केवढे मोठें साहस ! आणि ऐकून स्तब्ध राहणारा चा किसी अविचारीपणा ! मुंबईसरकारांनीं, कर्नल फेर यांस प्रमाणिक, व न्यायनिष्ठ हीं विशेषणे दिलीं आ- हेत. त्या विशेषणांस ते पात्र नव्हते असे आमचें ह्मणणे नाही व कोणीही ह्मणं शक- णार नाहीं; पण त्यांची समजूत अशी कांहीं विलक्षण होती कीं ज्याच्याविषयीं त्यांचें एकदा मन विटलें की त्याचें सर्व कृत्य त्यांस दोषरूपच दिसत असे; अर्थात त्याचा निःपात केल्यावांचून त्यांस चैन कसें पडेल? पण मुंबईसरकारांनी त्यांस कितपत आ श्रय द्यावा ही गोष्ट मोठी विचाराची होती. अगदीं अविश्वसनीय गोष्टी ऐकण्याला देखील अगदीं माविक होऊन बसणे त्यांस योग्य नव्हतें; आणि जर त्यांजवर त्यांचा येवढा मरंवसा होता तर त्यांनी महाराज यांजवर राजद्रोहाचा आरोप आणण्याचा घाट घातलाच होता आणि त्यांजबद्दलचीं प्रमाणे देखील दाखविली होतीं. बडोद्यां- तीळ लोक दक्षिणेत आणि कोंकणांत जात होते व महाराजांचा विश्वासक जासूद अक्कलकोटास साधूच्या दर्शनास जात होता, हा पुरावा कांहीं न्यायाधीशापुढे लट- का पडण्यासारखा नव्हता, आणि राज्यकारस्थानाच्या उद्देशानेंच जात होते हा पु- रावा कर्नल फेर यांच्या साक्षीने होणार होताच; मग विषप्रयोग करण्यामध्ये महाराजां चें अंग होतें, असा त्यांजवर नवा आरोप आणण्यापूर्वी राजद्रोहाच्या आरोपाबद्दल चौकशी करून महाराजांस त्याचवेळेस मद्रासेस पाठविले असतें तर बरें होतें. श्रीरंगपट्टणच्या टिपु सुलतानाने आपले एजंट फ्रेंच सरकारच्या वसाहतींत पाठवून इंग्रज सरकारच्या राज्याला अपाय करण्याचें जें कारस्थान केलें होतें, त्यापेक्षां मल्हा- रराव महाराजांचें कारस्थान कर्नल फेर यांच्या दृष्टीने कोठें कमी होतें ! ! ! कर्नल फेर यांच्या स्तुतिपाठकांमध्ये टकर साहेब अग्रगण्य आहेत. त्यांनी त्यां- ची आपल्या मिनिटांतील दुसऱ्या कळमांत अतिशयच स्तुति केली आहे. कर्नल फेर अतिशय स्तुतीस पात्र आहेत. त्यांनी आपल्या मनांत जी गोष्ट आणिली ती धैर्य, उत्साह, आणि दृढनिश्चय मनांत धरून शेवटास नेली; त्याबद्दल ज्यास त्यां- च्या गुणांची कदर आहे ते त्यांची प्रशंसा करतील आणि त्या चाकरीबद्दल त्यांस मोबदला मिळेल * असे लिहिले आहे. पण जेव्हां त्यांस रेसिडेंटाचे हुद्यास नालायक ठरवून गव्हरनर जनरल यांनी त्या हुद्यावरून काढून टाकिलें, तेव्हां टकरसाहेब मुंबईच्या कौन्सिलांत नव्हते हें बरें झालें. नाही तर त्यांनी ज्याची पराकाष्ठेची स्तुति केली त्याचा असा अपमान झालेला पाहून त्यांस फार वेद झाला असता. कोणी कितीका मोठा असेना कोणताही लेख लिहितांना त्यानें सत्याकडे फार लक्ष दिले पाहिजे, नाहीं तर तो लेख जोपर्यंत असेल तोपर्यंत त्या लेखाचा उपहास व्हावयाचाच !

  • “ He deserves the highest praise for the courage, energy, and unswerving de-

termination with which he has persued the important objects which he has kept in view; and I trust that he may receive this well-merited commendation from those who can best appreciate the difficulties of the position in which he has been placed, and the benefit of the services." (Blue Book No. 1, Page 65, Section 2.)