पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. दुसरें एक प्रमाण कर्नल फेर यांनी दाखविले आहे, तें हें कीं, अक्कलकोट येथें. गायकवाडांचे एजंट नेहेमीं जातात त्या गोष्टीकडे माझें लक्ष लागले आहे. पीं. याबद्दल सरकारास सूचना केली असे मला वाटते. परंतु अक्कलकोटच्या पोलिटे- कल सुपरिंटेंडंट यांस मीं याबद्दल काही लिहिले नाहीं. अक्कलकोट येथे कोणी साधु राहत आहे त्याजला महाराजांना मुलगा झाल्याचे वर्तमान सांगण्याच्या बाह्यात्कारी निमित्ताने महाराजांचा विश्वासक जासूद हल्ली जात आहे. * याच सदराखाळीं दादाभाईविषयी कर्नल फेर यांनी पुनः तीच्यातीच रडकथा गायली आहे. त्यांनी दरबारांतील बैठकीबद्दल महाराजांस खलिता लिहून दिला, व आपण इंग्लंडामध्ये तें कार्य घडवून आणण्यासाठीं एजंट होऊन गेले, वगैरे गोष्टी, कथन केल्या आहेत. सदहू रिपोर्टाचे शेवटीं मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीचा काय परिणाम होणार होता याविषयीं त्या भविष्यकारानी भविष्य कथन केले आहे. कलम १७४ यांत कर्नल फेर ह्मणतात कीं, अशा प्रकारच्या स्थितीचा लौकर अथवा उशिराने एकच परिणाम होईल हे उघड आहे. गायकवाडांच्या मुलुखांतील निरनिराळ्या भागांत उघड दंगे होऊं लागले आहेत. सरकारांनीं मध्यस्थी केली नसती, आणि कमिशनापुढे काम चाललें नसते, तर यापूर्वी कवींच दंगा झाला. असता. सरदार आणि लष्करी वर्गाच्या लोकांचे दावे महाराजांच्या मर्जीवर अनि. र्णित राहूं देणे, हा उघड मोठा धोका आहे. आणि त्याजवर मीं टिका केली पाहिजे. असे नाहीं. उपासमार, जरूरीच्या वस्तूचा अभाव, आणि अब्रूदार व प्रतिष्ठित कु.. टुंबांचे मानभंग यांपासून सर्व काळीं स्वाभाविक परिणाम घडतात, ते येथे ही घडावयाचेंच. ज्या रेसिडेंटाने मल्हारराव महाराज यांजवर शेवटी राजद्रोहाचा देखील आरोप. स्थापन करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या आरोपाबद्दल जीं प्रमाणे दाखविलीं तीं सामाग्य अकलेच्या मनुष्यास देखील अगदी असंबद्ध आहेत असे समजण्यासारिखें असतां, मुंबईसरकारास तीं खोटीं वाटलीं नाहींत हा कांहीं सामान्य अविचार नाहीं. अशा असंबद्ध लेखाबद्दल त्यांनी त्यांस कांहीं टपका न देणें यास आम्ही गर्भित अनुमोदन समजतों. अक्कलकोट संस्थान अगदी लहान, त्याचा राजा बालक, आणि ब्रिटिश सरकारच्या कामगारांच्या देखरेखीखालीं संस्थानचा कारमार चालत आहे त्या संस्थानांत महाराजांचे एजंट कांहीं तरी राज्यकारस्थान उपस्थित करण्याच्या उ..

  • “ The frequent visits which have for some months pasta been made by Agents

of the Maharaja to the State of Akulkote, which is now under British management: have attracted my attention. I am under the impression that I mentioned this con-. fidentially to Government, but I have not communicated with the Political Superin- tendent, Akulkote, on the subject. It is, however, going on at the present time-a favourite Jasood of His Highness having left for Akulkote this day (31st October) ostensibly to communicate the birth of a son and heir to the Gadee to an aged sooth- sayer said to reside at or near Akulkote. " ( Blue Book No. 4, Page 62, Section 159.)