पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

tus गवरनर साहेब यांचें आगमन. (१९) दुर्दैव असे हात धुऊन त्याच्या पाठीस लागले होतें कीं, गवरनर साहेब यांचे बडोद्यास आगमनच महाराज यांच्या विपदशेस विशेषेकरून कारणीभूत झाले. * हर्दू सरकारांमध्ये स्नेहसंबंध जडल्यापासून सर सी. मोर फिझिराल्ड बडोद्यास येईपर्यंत इंग्रज सरकारचे प्रतिनिधी बडोद्याच्या राजाच्या दरबारांत देखील राजास ""

  • नेक नामदार गवरनर साहेब यांची स्वारी बडोदें येथे येणार म्हणून फार दिवस बोलवा होती.

त्याप्रमाणें ता० ७ जानेवारी दिवसाचे चार वाजतां येऊन दाखल झाली. सेनाखासखेल समशेर बहादूर मल्हारराव महाराज गायकवाड हे पूर्वापार संप्रदायाप्रमाणे दरकदार, मानकरी, शिलेदार आदिक- रून फौजेसह स्टेशनावर सामोरे गेले होते. नामदार ह्यांची स्वारी स्टेशनावर दाखल होताच रेल्वे- कडील अम्मलदार यांणी मोठाले अवाज रेलावर कांहीं पढ़ार्थोचे गोळे मांडून एकवीस केले. पुढे स्टेशनावर नामदार सरकारची आणि महाराजांची भेट झाली. नंतर त्यांणी आपले जामात व रावसाहेब गोपाळराव मैराळ ह्यांच्या भेटी करविल्या. तसेंच नामदार साहेबानींही आपलेकडील अम्मलदारांच्या आणि गायकवाड सरकारच्या लोकांच्या भेटी करवल्या. अशी मुलाकत होतांच गायकवाड सरकारकिड्न एकवीस तोफांची सलामी झाली. याप्रमाणें पलटणी, पायदळ, घोडेस्वार, शिबंदी वगैरे लोकांच्या तोन फैरी झाल्या, व होलारांचे बाजे, नगारा, नौबती, शिंगें, करणें, तासे- मरफे व तऱ्हेतऱ्हेचे इंग्रजी बाजे सुरू झाले. कांहों मिनिटें नामदार याणीं स्टेशनावर उभें राहून सर्व फौज पाहिली. नंतर स्टेशनावरून महाराज याणी नामदार यांचा हात धरून वेटिंगरूममध्ये आणिले. तेथें थोडेंसें राहिल्यावर हत्ती शृंगारलेले होते त्यांपैकी सोन्याचे अंबारीच्या हत्तीवर नामदार व महाराज आणि पाठीमागें हरोबादादा बसले व कांहीं हुजरेही चढले. याप्रमाणे दुसरे साहेब लोकही एका मा गून एक हत्तोचे हौद्यांत बसून एकदांच चोपदार, भालदार ह्यांचा ललकारा " निगारखो महाराज असा होऊन मोठ्या थाटानें स्टेशनावरून रेसिवेंट साहेब ह्यांचे बंगल्यांत जाऊं लागली तो दुतर्फा रस्त्यांतून फौजेच्या लोकांच्या सलाम्या झाल्या. नंतर नामदारांची स्वारी रेसिडेंट साहेबांच्या बंगल्यांत दाखल होतांच रेसिडेंटींतून सलामीच्या तोफा सुरू झाल्या. पानसुपारी झाल्यावर नाम- दार याणी महाराजांस सोन्याच्या अंबारीत बसविलें. नंतर महाराजांची स्वारी मंडळीसह परत शहरांत आली. दुसरे दिवश रविवार असल्यामुळे लिहिण्यासारखा प्रकार विशेष शहरांत झाला नाहीं. सोमवारी बारा वाजतां सकाळी नामदार गवरनर साहेबांकडून लेवी झाली, आणि त्याच दिवशी रात्रौ महाराजांनों नामदारांस पानसुपारीची मेजवानी केली. रोषनाई दुतर्फा रेसिडेंटाच्या बंगल्यापासून तो थेट राजवाड्यापर्यंत एकसारखी केली होती, मधून मधून दर कमाणीच्या दरवा- ज्यावर हंड्या लावून परीचों सोंगें मुलांस देऊन बसविलीं होतीं व कलाबतचे फुन्ने लावून दर 'एक' ताटीस एक तसबीर व वरती एक मेणबत्तीचें वालसेट लाविलें होतें. कापापासून शहरच्या वेसीप- र्यंत साधी रोषनाई केली होती. एकंदर दिवा सुमारे दोन लक्ष लाविला होता. हा लाईट राणी. सरकारचे चिरंजिवाकरितां जसा मुंबईत केला होता त्याप्रमाणेंच व कांहीं अंशांनीं त्यापेक्षाही ज्या- स्त म्हटले असतांही चालेल असा होता. अशी रोषनाई पूर्वी कधींच झाली नाहीं. नामदार साहेबांकरितां मांडव म्हणजे जागा तयार केली होती. त्या जाग्यास छत आणि खालील रुजाम्यावरील कापड भरगच्ची जरतारीचें होतें. कलावंतिणीचे ताफे सुरू होते. पानसुपारी व अत्तर गुलाब महाराज याणीं नेक नामदार गवरनर साहेब यांस स्वतः दिलें. बाकीच्या साहेब लोकांस दरबारांतील दरकदार मंडळीनों मुख्यत्वे करून रा० रा० बाळासाहेब पटवर्धन याणी दिलें. आतां फुला- चे हार जसे असावयाचे तसे भरपूर नवते. या कामांत कारभाऱ्यांचे दुर्लक्ष झालें. नंतर स्वारी सर्व साहेब लोकांसह समारंभानें छावणींत परत गेली. मंगळवारीं मोती बागेत महाराज याणीं गवर ( पुढे चालू . )