पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१२९) मल्हारराव महाराज यांच्या कृत्यास त्यांच्या पूर्वजांच्या कृत्याचें साधर्म्य देतां येणार नाहीं, अशी त्यांचीं कृत्यें फारच थोडीं होतीं. आणि तीं उघडकीस आणण्यांत कांहीं विशेष अर्थ नव्हता. त्यांनीं आपण होऊन कबूल केले होतें कीं, मी हल्लींच्या काल- मामाप्रमाणें माझ्या राज्यामध्ये सुधारणूक करण्यास उत्सुक आहे. त्याच वेळेस कर्नल फेर यांस काढून एखाद्या सौम्य स्वभावाच्या व नितीमान् साहेबाची रोसेढेन्सीच्या हुद्यावर नेमणूक केली असती, आणि सर्वांशीं गुणसंपन्न दिवाण नेमण्याविषयीं म- ल्हारराव महाराज यांस सला दिली असती, ह्मणजे सर्व गोष्टी यथास्थितपणें घडून आल्या असत्या. इंग्रजसरकारच्या रयतेवर जुलूम होत आहेत, इंग्रजसरकाराबरोबर केलेले कौल- करार पाळण्यात येत नाहीत, आणि गायकवाडांच्या राज्यांतील अव्यवस्थेमुळे भ यंकर बखेडे होऊं लागल्यामुळे इंग्रजसरकारच्या मुलुखास आणि त्यांच्या आश्रया- खालच्या संस्थानांस उपद्रव होण्याची चिन्हे दिसतात, हें कर्नल फेर यांचें दृढ कथन कमिशनापुढे शाबीत झाले काय ? कमिशन नेमण्याचा मुख्य उद्देश सफळ झाला नसतां, व त्यांत कर्नल फेर यांनी कितीक मजकूर उगीच फुगवून सांगितला असें निदर्शनास आले असता त्यांची प्रशंसा करणें हें नवलास्पद नाहीं काय ? कर्नल फेरसारख्या रेसिडेंटाबरोबर सख्य ठेवून आपला राज्यकारभार सुयंत्र चालविणे हे हिंदुस्थानांतील कोणत्या तरी राजास शक्य होते काय ? जे राजाच्या शत्रूचे पूर्ण कैवारी आणि अर्थिजनाचे केवळ कल्पतरु बनून बसले होते आणि सर्व राज्यकारभार राजाने आपल्या तंत्रानेच चालवावा असा ज्यांचा दुराग्रह होता, तशा रोसिडेंटापुढे कोणत्याही राजाचा कसा टिकाव लागला असता! ही गोष्ट मात घेऊन मल्हारराव महाराजांच्या वर्तनाकडेस लक्ष दिले म्हणजे असेच ह्मणणे भाग येतें कीं, बडोद्याच्या राष्ट्राचें दुर्देव या मुर्तीद्वयरूपानें या जगावर अवतरलें होतें. कमिशनच्या रिपोर्टाचा गवरनर जनरल यांनी शेवट निकाल केला तेव्हां रेसिडेंट यांस असा हुकुम दिला होता कीं, राज्यामध्ये काय सुधारणूक होत आहे, त्या वि षयीं नजर ठेवून सरकारास रिपोर्ट करावा. रिपोर्टाची मुदत तारीख ३१ डिसें- बर सन १८७५ पर्यंतची होती. व दरम्यान जेव्हां रोसडेंटास उचित वाटेल ते- व्हां त्यांनीं रिपोर्ट करावा असा त्यांस हुकूम होता. कर्नल फेर यानीं त्याप्रमाणे तारीख २ नवंबर सन १८७४ रोजी मुंबई सरका- रास पत्र लिहिले आहे. गवरनर जनरल यांचा खलिता महाराजांस पावल्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी हा रिपोर्ट केला आहे. त्या तीन महिन्यांत दादाभाई नवरोजी यांच्यानें उघड दिसून येईल अशी राज्यांत सुधारणूक करविली नाही. का रण त्यांस जे कामदार लोक पाहिजे होते ते त्यांस मुंबई सरकारकडून मिळाले न- व्हते; व जुने त्यांस नको होते; व रेसिडेंट त्यांस पराकाष्ठेचे प्रतिकूळ होते; तथापि रयतेवर अन्यायाचे जुलम होणे तर सर रिचर्ड मीडचें कमिशन नेमण्याचा ठराव झाल्याबरोबर बंद झाले होतें; असे असतां कर्नल फेर यांनी आपल्या रिपो- १४