पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. ( १२८ ) मानिलॆ आहे व ज्यानें इंडियासरकाच्या स्पष्ट हुकुमाकडेस अलक्ष केले आहे त्यास कामावरून दूर करणे यांत अन्याय तो कसचा ! गवरनर जनरलच्या पत्ताचा सारांश वर लिहिल्यामुळे कर्नल फेर यांच्या गैरला- यकीविषयीं आणि मुंबई सरकारच्या डोळेझांकीविषया विशेष टीका करून सां- गण्याचें कांहीं ठरलेच नाहीं. कर्नल फेर यांजमध्ये छिद्रं शोधून काढण्याचें चातुर्य होते असें कबूल के आहे. राजाबरोबर प्रेमभावाने वागून व त्यास चांगली सला देऊन त्याला स न्मार्गास लावणे ह्या गुणाचा त्यांजमध्ये अभाव होता हेही स्पष्ट कबूल करण्यात आळें आहे. आणि ज्या वेळेस त्यांस रेसिडेन्सीच्या हुद्यावर राहूं दिलें त्या वेळेस दोष काढण्याचा प्रसंग नव्हता. राजाबरोबर समेट होऊन प्रेमभावाने वागणाऱ्या रे- सिडेंटाची बडोद्याच्या दरबारांत गरज होती ही गोष्ट मुंबई सरकारास मान्य असतो फक्त कर्नल फेर यांचें पैशासंबंधीं कांहीं नुकसान होऊं नये एवढ्यासाठींच बडोद्याच्या दरबारांतून आम्ही त्यास काढिलें नाहीं असे ते सष्ट ह्मणतात, याहून अविचार आणि अन्याय तो कोणता असावयाचा ! ! आणि नानासाहेब खानवेलकर यांस दिवाण नेमून मल्हारराव महाराज यांनी त्यांच्या राष्ट्रांतील वीस लक्ष प्रजेच्या हि- साकडेस अलक्ष केले यांत आणि कर्नल फेर यांस बडोद्याच्या रेसिडेन्सीच्या हुद्यास ते लायक नसतां त्यांस नेमिर्के आणि ज्या उद्देशानें त्यांची नेमणूक केली तो उद्देश पूर्ण झाल्यावर त्यांस त्या हुद्यावर राहूं दिळे यांत भेद तो कोणता ? सार्वजनिक हि ताकडेस अलक्ष करून व्यक्तींच्या हिताविषय विशेष कळकळ बाळगणे हे दोघांच्या ही कृत्याचे पर्यवसान एकच होतें. काढण्यामध्यें कर्नल आह्मांस मोठें न. असे ते कोणते ठराव झाला तो मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांतील दोष बाहेर फेर यांनी मोठा पराक्रम केला असें झणण्यात आले आहे त्याचें वळ षाटतें. कमिशन नेमून चौकशी केल्यावांचून न कळणारे दोष गुप्त होते! मल्हारराव महाराज यांनीं कमिशन नेमण्याचा महकूब करण्यासाठी गवरनर जनरल यांस खलिता लिहिला. त्यांत त्यांनी स्पष्ट लिहिलें होतें कीं, बडोद्याच्या राज्याचा राज्यकारभार मागील रीतीप्रमाणे चालला आहे आणि त्यांत फेरबदल झाली पाहिजे. यांत माझ्या राज्याचा राज्यकारभार ज्या- रीतीनें चालविला पाहिजे तसा नाहीं असें महाराजांनी स्पष्ट दर्शविलें होतें. मागी- ● राज्यरीत कशी होती याविषयी अज्ञान कधीं होतें ? आणि रेसिडेंटाबरोबर- ध्या पत्रव्यवहारावरून कोणती गोष्ट न कळण्यासारखी होती कीं, त्याजबद्दल क मिशन नेमून चौकशी करण्याची जरूर होती ? मल्हारराव महाराज यांची तक्रार कायती एवढीच होती कीं, माझ्या पूर्वजांनी ज्या रीतीने राज्य चालविलें होतें त्या रीतीनें मीं राज्य चालविलें असतांव आतां मी नव्या रितीभातीस अनुसरून राज्य चाल. विण्यास मान्य असतां माझ्याच कारकीर्दीत तक्रारी उत्पन्न करण्याचे कारण काय ? आणि हे त्यांचें म्हणणें सर्वांशीं जरी वाजवी नव्हते तरी अगदींच असंबद्ध नव्हतें.