पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२७) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. फेरे यांस बडोद्यांतून काढिलें असतें. विषप्रयोग करण्याचा अवोर प्रयत्न कर- ण्यांत आला याबद्दल गवरनर जनरल यांस फार वाईट वाटते. परंतु कर्नल फेर यांस अशा प्रसंगी बडोद्यांतून काढण्यांत आले यांत कांहीं अनुचित झाले आहे असे गवरनर जनरल यांच्याने कबूल करवत नाहीं. कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यांत आळा ही गोष्ट व्हाइसराय साहेब यांस तारीख १३ नवंबर रोजी समजली आणि ही बातमी समजण्यापूर्वीच जरी सर्व कागदपत्र ग. वरनर जनरलच्या पाहण्यांत आले नव्हते तरी जे त्यांजपाशी होते त्याजवरूनच त्यां- ची खातरजमा झाली होती कीं, कर्नल फेर यांस काढून त्यांच्या जागेवर दुसरा कामदार पाठविणे अवश्य आहे. नंतर ता० २३ नवंबर रोजी सर्व कागदपत्र पाबळे आणि त्यावरून तर बडोद्याची अशी विलक्षण स्थिति कळून आली की, कर्नल • फेर यांस तात्काळ हुद्यावरून काढणें हें सार्वजनिक हितासाठी अगदीं जरूर आहे असे गवरनर जनरल यांस वाटलें. त्यांस असें कांहीं भय वाटत नाहीं कीं, त्यांनीं कर्नल फेर यांस बडोद्यांतून काढिले हे त्यांचें कृत्य निर्बळपणाचें आहे असे देशी राजांच्या मनांत येईल आणि अशा प्रकारचे विचार मनात आणून जेथे सार्वजनि- क हिताचा संबंध आहे अशा कोणत्याही प्रसंगी कोणत्याही गोष्टींत ते आपलें कर्तव्यकर्म बजाविण्यापासून आणि उपाय योजण्यापासून कर्धीही पराङ्मुख होणार नाहींत. कर्नल फेर यांस काढिल्यामुळे राजांच्या दरबारांत नेमिळेल्या ब्रिटिश अधिका प्यांच्या मनावर भळताच ग्रह होईल असें मुंबई सरकार मानतात. परंतु गवरनर जनर ल यांस त्या संबंधानें कांहीं धोका वाटत नाही. त्यांची उत्कट इच्छा अशी आहे कीं. ज्यांस जबाबदारीच्या हुद्यावर नेमिलें आहे व ज्यांस नाजूक आणि महत्वाची कामे बजावण्याची आहेत त्यांचा प्रत्येक वेळी सांभाळ करावा. तसा त्यांचा सांभाळ जोपर्यंत त्याचे वर्तन हुकुमाला अनुसरून असेल तोपर्यंत तत्परतेने करण्यात येईल; परंतु ज्या कामदाराचा त्यास दिलेल्या हुकुमांच्या वास्तविक रहस्याविषयी विपरीत ग्रह होतो इतकेच नाही पण स्पष्ट अर्थाचे हुकूम जो मोडतो, ज्यास आपल्या चुका उघड करून दाखविल्या असतांही कळत नाहींत आणि सातव्या पारिग्राफांत लि- हिल्याप्रमाणें ज्याची गर्दा करण्यांत आली आहे व्यास कामावरून काढण्याचा परि- णाम घातक होण्यापेक्षा उलटा हितकारक होईल; आणि जर कर्नल फेर यांजप्रमाणें सरकारच्या हुकुमाकडेस कोणीं अलक्ष केले तर त्यास कामावरून दूर करण्यास गवरनर जनरल कधींही मागे पुढे पाहणार नाहीत; मग तो कोणी ही असो. कर्नल फेरविषयों गवरनर जनरलचें कृत्य अन्यायाचें आणि जुलमी असे मुंबई सरकारच्या ध्यानांत आले याबद्दल गवरनर जनरल यांस वाईट वाटते. सर्व काग दपत्र मागविल्यापूर्वी राजीनामा देण्याची कर्नल फेर यांस सधि देण्यांत आलो अ. सतां त्यांनी ती गमावली. आणि ज्या अफिसरास मुंबई सरकारांनी नालायक