पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. बोलून हरकत घेतली. दुसऱ्या एका प्रकरणांत त्यांस असा ठपका दिला कीं, गायकवाडांस तुझी जे उत्तर दिलें तें अतिशय अयोग्य आहे. तिसऱ्या एका प्रक. रणांत मुंबई सरकारांनी 'अतिशय ताजूब वाटते' असे शब्द उच्चारिले. एका प्रसंगीं कर्नल फेर यांस असे लिहिण्यांत आलें कीं, तुझीं हुकुमाकडे सर्वथैव अल- क्ष केल्यामुळे तुमच्या आणि दिवाणाच्या एक विचारानें राज्यामध्ये जी सुधारणूक व्हावयाची आणि इंडिया सरकारचे मुख्य उद्देश ज्या योगाने सफळ व्हावयाचे त्या गोष्टीस मोठें विघ्न आले आहे. आणि तारीख २७ सप्टेंबर सन १८७४ च्या पत्रांत आणखो त्यांस असे लिहिलें कीं, तुझी जो खुलासा सांगतां तो मनाला सं- तोषदायक नाहीं. आणि मुंबई सरकारांनी असे तर वारंवार बोलून दाखविले आहे की, कर्नल फेर गवरनर जनरलच्या स्पष्ट हुकूमाकडेस अलक्ष करीत आहे. परंतु ह्या आणि दुसऱ्या गोष्टी तुझीं गवरनर जनरल यांस कळविल्या नाहींत. तारीख १७ सप्टेंबर सन १८७४ नंबर ३१ चें पत्र, तारीख २५ जुलई सन १८७४ चा ठराव झाल्यानंतर गायकवाडाबरोबर पत्रव्यवहार झाला त्या संबंधीं असतां त्यांत देखील याबद्दल कांहीं लिहिलें नाहीं. तारीख ६ अक्टोबर सन १८७४ घ्या इंडिया सरकारच्या पत्ताचें उत्तर तारीख २२ अक्टोबर रोजी पाठ- विण्यांत आलें, त्यांत व त्यानंतर तारीख २३ अक्टोबर सन १८७४ नंबर ६१५९ च्या पत्तांत गायकवाडाबरोबर झालेल्या पत्त्रव्यवहाराविषयीं पुनः कळविण्यांत आलें 'त्यांत देखील याबद्दल कांहीं मजकूर लिहिला नाहीं. इंडिया सरकारांनीं तार करून जेव्हां सर्व कागद पत्र मागविले तेव्हां त्यांस सर्व माहिती झाली. तारीख २३ नवंबर रोजीं पत्त्र पावलें आणि तारीख २५ नवंबर रोजी कर्नल फेर यांस रोसडेंग्सीच्या हुद्या- वरून काढून टाकण्याविषयों हुकूम दिला. मुंबई सरकारास जुलई महिन्यांत असे वाटलें होतें कीं, रोसडेन्सीच्या हुद्यांत फेरफार करणें जरूर होतें; तर आगष्ट महिन्यांत कर्नल फेरे यांस हुकुमाकडे अलक्ष केल्याबद्दल त्यांनी उपका दिला त्यावेळेस तरी तात्काळ गवरनर जनरल यांस कळ- बावयाचें होतें. जर त्यांनी तसे केलें असतें तर गवरनर जनरल यांनीं त्यांस मनः- पूर्वक मदत दिली असती. रेसिडेन्सीच्या हुद्यांत फेरफार करण्याविषयीं यांचे मनांत आलें असो अगर नसो, कर्नल फेर यांजवर गवरनर जनरल यांनी विश्वास ठेविला होता त्यास ते पात्र नाहींत ही गोष्ट तरी मुंबईसरकारांनी इंडिया सरकारास कळवावयाची होती. गवरनर जनरल यांनीं हुकम केले होते आणि कर्नल फेर यांनी कोणत्या रीतीन वागायें याजविषयी त्यांनी त्यांत धडा घालून दिला होता, सबब त्यांच्या हुकूमाकडे अलक्ष केल्याबद्दळ व त्यांनी दाखविलेला मार्ग सोडून मलत्याच रस्त्याने गेल्याव द्दल व दरबाराबरोबरच्या वाटाघाटीत अयोग्य रीतीने त्याचें नांव पुढे केल्याबद्दल गवरनर जनरल यांस गैर माहीत ठेवावयाचें नव्हतें. मुंबई सरकारांनी ह्या गोष्टी ज्या वेळेस कळवावयाच्या त्या वेळेस गवरनर जनरल यांस कळविल्या असत्या तर गा- यक्रवाढाकडून विनांत होण्यापूर्वी आणि विषप्रयोगाचा प्रयत्न होण्यापूर्वीच कर्नल