पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सरकारांनी ही कर्नल फेर यांस पूर्वीच काढिलें असतें. कर्नल फेर यांस रोसडेन्सी- घ्या हुद्यावरून काढावे याविषयीं गायकवाडांच्या खलित्यांत तरी हाच कारणे सांगि- तली आहेत कीं, ते आमचे फिर्यादी असतां त्यासच न्यायाधीश नेमिलें आहे या मुळे त्यांच्या हातून निष्पक्षपातानें न्याय होणार नाही आणि ज्याच्यासाठीं कर्नल फेर यांनी दरबाराबरोबर वादविवाद केला त्या लोकांस रोसडेंटाचा आश्रय असल्यामुळे सुधारणूक करण्यांत ज्यास्त अडचण आली आहे. परंतु कर्नल फेर यांस रेसिडेन्सींच्या हुशावरून काढण्याची जी रीत योजिली व ज्या समयास त्यास काढिले ती गोष्ट मुंबई सरकारात संमत नाही. गायकवाडांनीं खलिता लिहिल्यावर आणि कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केल्यावर लागलींच त्यांस काढण्यांत येतें. अशा आणीबाणीच्या प्रसंगी कर्नल फेर यांस रेसिडेन्सीच्या हुद्यावरून काढि- ल्यापासून देशी राजांच्या मनाचा भलताच ग्रह होईल. गायकवाडांनीं स्खलिता छि हिल्यावरून त्यांस काढिलें अशी त्यांची समजूत होईल आणि इंडिया सरकारचें कृ. त्य निर्बळपणाचें एक प्रमाण आहे असे ते मानतील. यापासून बडोद्यांत तात्का- लिक असा ग्रह झाला की, गायकवाडांचा यांत पूर्ण जय झाला. मुंबई सरकारास आणखीं असें भय वाटलें कीं, ज्यानें धैर्य धरून प्रमाणिकपणा- ने आणि मोठ्या तत्परतेनें आपढ़ें काम बजावून एका मोठ्या देशी राजाच्या राज्य कारभारांतील दोष उघडकीस आणिले आणि आपण जे सांगितलें तें खरें आहे अशी इंडिया सरकारची खात्री करून दिली. त्यास काही मोबदला न देतां कामावरून काढून टाकणें ही गोष्ट हिंदुस्थानामध्ये राजकीय कामावर नेमिलेल्या लोकसमूहाच्या मना- स अतिशय लागेल. कर्नल फेर यांची स्वतःची चाल व त्यांचा गायकवाडाबरोबरचा संबंध हा सर्वां- स माहीत झालेला आहे. आणि कमिशनच्या रिपोर्टावर इंडिया सरकारांनी जेव्हां ठराव केला तेव्हां त्यांस जी गोष्ट हीं माहीत झाली आहे ती त्यावेळेस माहीत असली पाहिजे. आणि त्यांनीं त्याच वेळेस जर सूचना केली असती आणि कर्नल फेर यांस त्याच पगाराची दुसरी जागा देण्याची अथवा दुसऱ्या रीतीने त्यांचा तोटा भरून देण्याची सवड काढिली असती तर त्यांस आणि त्याचप्रमाणे लो- कांस ही फेरबदल मान्य झाली असती; परंतु ज्याच्या प्रयत्नानें बडोद्याच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशसरकारास मध्यस्थी करण्याचा फायदेकारक प्रसंग साध- ला त्या रेसिडेंटाविषयीं आतां जो इंडियासरकारांनी हुकूम केला तो आमच्या मतें अगदीं अन्यायाचा आणि कडक आहे. दुसऱ्या मुद्याविषयीं मुंबईसरकारचें झणणे असे आहे कीं, कर्नल फेर पांस आ- मचे हुकूम पोहोचल्यावर आह्मांस थोड्याच काळांत असे समजलें कीं, इंडियास- रकारच्या ठरावातील बीज ध्यानांत न घेतां दादाभाई यांस दिवाण आणि नानासा- हेब खानवेलकर यांस प्रतिनिधी नेमण्याबद्दल हरकत घेण्यांत कर्नल फेर यांनी मोठी