पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (११९) रास पूर्ण माहिती कळविण्यांत फार विलंब झाल्यामुळे सार्वजनिक हितामध्ये मोठी गैरसोय झाली आहे. व त्याबद्दल इंडिया सरकारास फार चटपट लागली आहे. इंडिया सरकाराचा हुकूम मिळविण्याकरितां मुंबई सरकारांनी त्यांजकडे जें प्रकरण पाठविलें तें महत्वाच्या कामामध्ये पहिल्या प्रतीचे होते आणि ते पाठविण्यास जो विलंब झाला त्याबद्दल तर त्यांस विशेष दुःख वाटतें. (बडोद्याचे दरबारांनी का- मदार लोक मागितले होते त्या संबंधानें है लिहिणें असावे असे दिसतें. ) आठवे कलमांत असे लिहिले आहे की, मुंबई सरकार, कर्नल फेर, आणि दर बार यांजमध्ये अतिशय महत्वाचा पत्रव्यवहार आगष्ट महिन्यांत झाला असतां नो. वेंबर महिन्यापर्यंत गवरनर जनरल यांस त्याबद्दल पूर्ण माहिती कळविली नाहीं. नवव्या कलमांत असे लिहिले आहे की, इंडिया सरकारास असे वाटतें कीं, कर्नल फेरव्या संबंधांत मुंबई सरकारांनीं जो मार्ग स्वीकारला तो कार्यगौरवाळा शोभेल असा नव्हता. व त्यांच्या आचरणाकडेस त्यांनी जे लक्ष दिलें तें अगदीं अपूर्ण होतें, आ- णि हें त्यांचें कर्त्तव्यकर्म होते की, ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडून आल्या त्या प्रत्येक गोष्टीविषयीं इंडिया सरकारास त्यांनी वेळचे वेळीं पूर्ण माहिती द्यावयाची होती.

  • या पत्राचें मुंबई सरकारांनीं तारीख १४ डिसेंबर सन १८७४ रोजी उत्तर

पाठावेळे. त्यांत त्यांनीं तीन मुद्यांवर तक्रार घेतली. १ कर्नल फेर यांस रोसडेन्सीच्या हुद्यावरून काढिल्याबद्दल. २ इंडिया सरकारांनी आपल्यास ठपका दिल्याबद्दल. ३ बड़ोद्याच्या दरबारसंबंधी आपला अधिकार काढून घेतल्याचदळ. पहिल्या मुद्याविषयी त्यांचे म्हणणे असे आहे कीं, कर्नल फेरसारख्या मोठ्या पदवीच्या अब्रूदार मनुष्यास इंडिया सरकारांनीं एकदम रेसिडेन्सीच्या अधिकारावरू- न काढून टाकिलें त्याबद्दल मुंबई सरकारास किती वाईट वाटते ते सांगतां देखील येत नाहीं. तथापि त्यांस ही गोष्ट कबूल आहे कीं, रोसडेंट यांचे हुद्यांत फेरफार करणे हे अतिशय जरूरीचें जरी नव्हतें तरी उचित होते; आणि कर्नल फेर यांच्या कारकीर्दीत घडून आलेल्या गोष्टी मुंबई सरकारच्या मनांत इतक्या ताज्या होत्या कीं, इंडिया सरकारांनी जरी व्याजवर आपला विश्वास आहे असे ह्मटलें होतें तरी जर मुंबई सरकारच्या हातांत तितक्याच पगाराची दुसरी जागा कर्नल फेर यांस दे- ण्याची सवड असती तर त्यांनी त्यास काढून ठुसरा रोसडेंट नेमिला असता. कर्नल फेर यांचे जे गुण राजाचे दोष उजेडांत आणण्यास उपयोगी पडले ते गुण त्या राजाला सदुपदेश करणें या मोठ्या नाजूक कामास योग्य नव्हते. मुंबई ब्ल्यू बुक नंबर 8 पान ८१ पहा.