पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४. गवरनर साहेब यांचे आगमन. मुंबई इलाख्याचे गवरनर, सर सी. मोर फिटझिराल्ड यांचें बडोद्यास आग- मन-मानापानाच्या संबंधानें फेरबदल आणि मल्हारराव महाराज यांच्या विपद्दशेचें बीजारोपण. सन १८७१ मध्ये मुंबई इलाख्याचे गवरनर नामदार सर सी. मोर फिटूझिराल्ड काठे- Sोते. मुंबईस परत जातांना गवरनर साहेब याणी आपल्या राजधानींत येऊन आपल्यास कृतार्थ करावे अशी खंडेराव महाराज याणीं त्यांस पत्रद्वारें विनंती केली होती, परंतु नामदार साहेब काठेवाडांतून परत फिरण्यापूर्वीच महाराज परलोकवासी होऊन मल्हारराव महाराज राज प्रतिनिधी झाले होते तेव्हां त्यानींही नाम- दार साहेब यांस आपल्या राजधानीत येण्याविषयीं आमंत्रण केल्यावरून ते सन १८७२ च्या तारीख ७ जानेवारी रोजी बडोद्यास आले. मल्हारराव महाराज याणी नामदार साहेब यांचा आदरसत्कार उत्तम रीतीनें केला, व त्यानींही महाराज यांचा सत्कार केला, परंतु त्यांत असे दर्शवून दिले की, महाराज यांस आम्ही राज प्रतिनिधी समजतों; राजे समजत नाहीं. कारण जमनाबाई साहेब यांच्या प्रसू- तीचा निकाल झाल्यावांचून त्यांस मल्हारराव महाराज बडोद्याचे राजे असे मानतां येत नव्हते. नामदार साहेब यांस सोन्याच्या अंवारीत बसवून मोठ्या समारंभानिशीं त्यांच्या मुक्कामावर महाराजानी पोहोचतें केले. महाराज स्वतःही त्याच अंबारीत बसले होते आणि खवास- खान्यांत हरीबा गायकवाड यांस बसविलें होतें. मल्हारराव महाराज राज्याचे अधिकारी झाल्यावर हरीबादादाच सर्व कारभार चालवीत होते; परंतु त्यांस दिवाणगिरीची पदवी दिली असे लोकांस समजण्यास या संस्काराखेरीज त्यांच्या दिवाणगिरी- यावरून त्यांचा अधिकार फार दिवस चालाव- बद्दल दुसरा कांही संस्कार झाला नाहीं. याचा नाहीं असे लोकांस सहज समजलें. नामदार साहेब महाराजांच्या दरबारांत आले त्या दिवशी रात्रीं शहरांत मोठा दीपो- त्साह केला होता. गवरनर साहेब यांची मर्जी सुप्रसन्न ठेवण्याकरितां मल्हारराव महाराज याणीं श्रम करण्यांत आणि पैसा खर्च करण्यांत मागे पुढे पाहिले नाही. या समारंभाबद्दल ज्ञानप्रकाश कर्ते यांस कोणी पत्र लिहिले होतें त्यांत या समारंभाचे यथार्थ वर्णन केलें आहे सबब तें पत्रच आम्हीं टीपेत छापले आहे ते पहावे म्हणजे मल्हारराव महाराज याणी नामदार साहेब यांचा सत्कार किती मनोत्सहानें केला तें समजेल. परंतु त्या राजाचें