पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. रिपोर्ट त ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या संबंधाने पाहतां आजपर्यंत मी काय काय केले आहे व पुढे काय करण्याचा माझा बेत आहे त्या सर्व थोड्याच दिवसांत आप- णास पत्रक पाठवून देईन. सारा कमी करण्याबद्दल मी सर्व व्यवस्था केल्या आहे. त; परंतु त्या व्यवस्था प्रघातांत आणण्याकरितां सरकारी कामगार मीं मागविले आ- हेत त्यांच्या येण्याची मात्र वाट पाहात आहे. अशा प्रकारच्या खलित्यांत ज्या अर्थी मला जे जे त्रास व जीं जीं दुःखे भोगात्र- यास लागत आहेत ती सर्व लिहून कळविता येत नाहीत त्या अर्थी आमचे दिवाण व रोसडेंट यांस आपली भेट घेण्याची कृपा करून परवानगी यावी. तारायंत्रद्वारे परवानगी विदित केल्यास मी आपला फार फार आभारी होईन. आपणाबद्दल आमच्या मनांत जी पूज्यबुद्धि आहे ती लेखी आपणास कळवीत आहे कळावे हे विनंती.* ( सही ) मल्हारराव महाराज यांची, राजवाडा बडोदें. हा खलिता गनवर जनरल यास पोहोचल्याबरोबर त्यांनी कमिशनाच्या रिपोर्टा- वरून महाराजांस खलिता लिहिल्यानंतर मुंबई सरकार, कर्नल फेर, आणि बडोद्याचें दरबार यांजमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचे दरोबस्त कागद तारायंत्राने सूचना देऊन ताबडतोब मागविले. आणि यांजवरून त्यांस स्पष्ट कळून आलें कीं, कर्नल फेर यांनी आपले व मुंबई सरकारचे हुकूम अगदीं तुच्छ मानून पराकाष्ठेचा अतिक्रम केला आहे. सबब त्यांनी सर लुईस पेली यांस बडोद्याच्या दरबारांत गवरनर जनर- लचे स्पेशल एजंट आणि कमिशनर नेमून कर्नल फेर यांस रेसिडेंन्सीच्या हुद्यावरून काढून टाकिलें. कमिशनच्या रिसोटीच्या संबंधानें जे कांहीं हुकूम द्यावयाचे ते सर्व इंडिया सरकाराकडून देण्यांत येतील असा हुकूम करून त्या संबंधाने मुंबई सरकारचा अधिकार काढून घेतला. गवरनर जनरल यांनी स्वीकारलेला मार्ग मुंबई सरकारास आवडला नाही. कर्नल फेर यांस रेसिडन्सीच्या हुद्यावरून काढिल्याबद्दल व आपल्या हातांतून अधिकार काढून घेतल्याबद्दल त्यांनी तक्रार चालविली; परंतु शेवटीं गवरनर जनरलचें करणें योग्य ठरून मुंबई सरकारचा त्या वादांत पराजय झाला. या संबंधाने झालेला पत्रव्यवहार फार महत्वाचा आहे व त्या योगाने पुष्कळ गुप्त गोष्टी उजेडांत आल्या आहेत; यासाठी त्याबद्दल संक्षेपानें सांगितलें असत वाजवी होईल असे वाटते. इंडिया सरकारांनी मुंबई सरकारास तारीख २५ नोवेंबर सन १८७४ चे पत्र लिहिलें. + त्यांतील सातवे कलमांत त्यांनी मुंबई सरकारास असा दोष दिला आहे कीं, तुमच्या आणि कर्नल फेर यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराविषयीं इंडियासरका-

  • वरील खालता १८७५ एप्रिल तारीख १–५च्या ज्ञानप्रकाशावरून घेतला आहे.

+ ब्ल्यूबूक नंबर 2 पान ६ पाहा.