पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (११७) जागतात हे दाखविण्यास वरील पत्र पुरे आहे. अशा रीतीच्या रेसिडेंट साहेबांच्या वर्तणुकीवरून मुसलमान लोकांचा दंगा करण्याच्या इराद्यास उत्तेजन मिळते व चो- हीकडे राजद्वेष उत्पन्न होतो. हीं वरील दोन उदाहरणें सर्व गोष्टींतून मासल्याकरि- तां दाखविळीं आहेत व ह्यावरून रोसडेंट साहेबांच्या हल्लींच्या वर्तणुकीपासून मला किती त्रास व अडचण होते आहे हें क्वचितच बरोबर कळेल. इंग्रज सरकारच्या रेसिडेंटाची ही वर्तणुक पाहून माझ्या मनाला हल्ली फार चिंता प्राप्त झाली आहे; कारण अशा वेळेस माझेविरुद्ध खोटा मजकूर समजावून देणार व मी व माझ्या प्र- जेमध्यें बेबनाव उत्पन्न करणारे व अशा प्रकारची स्थिति पाहून आपला मतलब सा- धून घेणारे लोक पुष्कळ आहेत. ह्याचा परिणाम इतकाच होईल कीं, ह्या साली बसूल कमी उत्पन्न होईल व माझ्या रयतेचें अस्वस्थ झालेले मन तसेच राहील. ह्या गोष्टीमुळे मला किती त्रास होत आहे व मी मनांत आणलेल्या सुधारणेच्या कामांत किती अडथळे येत आहेत याची कल्पना करणे मोठे कठीण नाहीं. मजपुढे जें काम आहे ते किती व कोणच्या प्रकारचें आहे हे आपणास पूर्णपणे माहीत आहेच; त्यास फेर साहेबांनी माझें किंवा माझ्या कारभाज्याचें मुळींच ऐकणार नाहीं अर्से झटल्यानें तें काम सिद्धीस जाण्याची बिलकुल आशा नाहीं असें झटले पाहिजे. वर लिहिले आहे त्यावरून फेर साहेब आपले कर्तव्यकर्म न स्मरून पाहिजे तें करतात असे माझे बिलकुल ह्मणणें नाहीं; परंतु त्यांचे आमचे विचार व मतें यांमध्ये फारच जबरदस्त अंतर आहे. फेर साहेब एकदां काही गोष्ट बोलले किंवा त्यांनी कांहीं गोष्ट केली ह्मणजे ती ब्रह्मलिखित असावी असे त्यांस वाटतें. सांनी झटले सांत ते अगदी कांहीं रतीभर देखील कमी करीत नाहीत. मला अद्याप चांगले का- रभारी नेमावयाचे आहेत ते नेमल्याखेरीज आमच्या महालांची चांगली व्यवस्था ए कदम व्हावयाची नाहीं, ही गोष्ट त्यांच्या लक्षांत येत नाहीं. माझ्याविरुद्ध कोणी कांही तक्रार केली की, ती ऐकण्यास ते एका पायावर नेहमीं उभे असतात व यामु. ळें जे मोठें काम पुढे करावयाचे त्यास त्यांजकडूनच हरकत उत्पन्न होते. कांहीं असो, माझें कांहीं चालूं द्यावयाचेंच नाहीं असा फेर साहेब यांचा निश्चय चालून तेच हल्लीं आमच्यावर चौकशी करीत आहेत, तेव्हा त्यांनीच आमचा न्याय पाहवा ही गोष्ट वास्तविक दृष्ट्या केवळ अन्यायाची आहे. फक्त ३ महिन्यांच्याच अनुभवावरून त्यांनी पूर्वीच आपल्या मनांत निकाल करून ठेविला आहे; तेव्हां त्यां च्या हातून मला निष्पक्षपातें न्याय मिळेल अशी मला बिलकुल आशा नाहीं. करितां याबद्दल काय विचार करावयाचा तो फक्त आपणाकडे मी सोपवितों. माझें ह्मणणें इतकेच की, माझा मला यथायोग्य न्याय मिळावा अशाबद्दल आपणाकडून योग्य तजवीज करण्यांत यावी. आपण मला ज्या कांहीं सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे मीं कांहीं कांहीं सुधारणा केल्या आहेत, त्या योग्य वेळी आपणास कळविण्यांत येतील. आतां कमिशनच्या