पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मानिस्त्रेट यांजकडे सोपविले. हा आरोपी एकदम बडोदें शहर सोडून गेला. व मला असें समजले आहे की, क्यांपांत जाऊन राहिला. तेथें त्याने काय केलें हें मला ठाऊक नाहीं; परंतु लवकरच दुसरे कांहीं शिलेदार व सरदार व त्याचे नौकर असे मिळून १५० मनुष्य एक टिकाणी जमले. शस्त्रे घेऊन माझे अमलास उघड रीतीनें धिःकार करूं लागले. माझे दरबारांतील जी मनुष्यें चांदरावाला समान लावण्यास गेली होती त्यांस त्यांनी असे सांगितले की ज्या खटल्यांत हजर व्हावें असे त्यांस समान आहे तो खटला जातीचा आहे व त्या खटल्यांत जबरदस्तीनें आरोपीस नेण्याची खटपट झाली असतां आली त्या कामांत आमचा जीव जाईतोपर्यंत मेहेनत करूं. नंतर त्यांनी त्यास घरी नेलें व हत्यारबंद होऊन त्याचे संरक्षणाकरितां पाहारा ठेवला. ह्या लोकांस नीट रीतीनें समजूत मिळावी व दरबारचे अमलात जोर यावा अशी आशा मनांत धरून मी व आपले दिवाण हा सर्व मजकूर कळविण्याकरितां रेसिडेंट साहेबा- कडे पाठविले, परंतु ज्या रीतीने शिलेदार आपली वर्तणुक चांगली आहे अशी प्रति_ पादन करीत याच शब्दानें व त्याच रीतीने त्यांची वर्तणूक बरी आहे अशी रेसिडेंट साहेब बोलले व याजमुळे माझ्या मनास फार चमत्कार वाटला. त्या जमलेल्या लो- कांस आपापले घरीं जा म्हणून सांगण्याचे रेसिडेंटानी नाकबूल केले व ते असे ह्मणाले की, जर फौनदारीतील फिर्याद काढून घेतली तरच ते लोक जातील. नंतर जेव्हां माझे हायकोर्टातील चीफ जस्टिस समजावून सांगण्याकरितां त्या लोकांकडे गेले यावेळेस यांनी असे सांगितले की चांदेरावाविरुद्ध फौजदारी खटला चालणार नाहीं व त्यांनी आपल्या घरी जावें. हे चीफ जस्टिसचें सांगणे त्यांनी नाकबुल केले व चांदे- रावचा खटला सोडून देऊन नवीन तक्रार काढली. ह्याच वेळेस रेसिडेंट साहेबांनीं मजकडे एक याद धाडली व या संबंधाने मी काय खटपट केली, हे मला विचारलें. ह्या यादीत लिहिलेला मजकूर व सरदारांचे ह्मणणे अगदीं एक सारखें व ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. ह्या गोष्टीविषयों दुसरे एक उदाहरण देण्याकरितां तारीख २० आक्टोबर सन १८७४ इसवी रोरोसिडेंट साहेबाकडून आलेल्या पत्राची नक्कल व मुंबई सरकारास त्या साहेबांनी केलेल्या अर्जाचे भाषांतर आपणाकडे पाठ विले आहे. ही अर्जी कांहीं शिद्धी महामेडन लोकांनी केली आहे व त्याची तक्रार अशी आहे की, त्याचे शेतांतील पीक त्यास कापूं दिले नाहीं व इतर प्रकार चा व्यास कांही त्रास झाला. ह्या अर्जीत आह्मी हत्यारे घेऊं असेंही भय दाखविले आहे ह्या गोष्टीकडे आपले लक्ष विशेष पोहोचले पाहिजे. चौकशीअंती असे कळू- न आले की, ह्या लोकांनी पावसाळा सुरू झाल्यापासून तालुक्यातील अम्मलदाराकडे व जमाबंदी खाग्रांतील मुख्य अधिकाऱ्याकडे किंवा दिवाणाकडे मुळीच अर्जी केली नव्हती. ह्या अर्जीकडे नुसतें पाहिले असतां ही खटपटी माणसांचे सांगण्यावरून झाली असा- बी असे दिसतें. कर्नल फेर साहेबांनी माझेकडून कांही एक खुलासा मागवला नाहीं च मला वर सांगितलेलें पत्र लिहिले. रेसिडेंट साहेब मजबरोबर कोणत्या रीतीनें