पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. मनापासून आश्रय दिला नाहीं तर ह्या राज्याची व्यवस्था चालावयाची नाहीं व ने फेरफार करणे जरूर आहेत ते व्हावयाचे नाहींत. वरील खलित्यास उत्तर लिहितां ना इतर गोष्टींबरोबर माझे मनांत असे आले होतें कीं, हल्लींचे रसिडेंट कर्नल फेर यांनीं माझ्या संबंधानें ठेवलेली वर्तणूक आपले नजरेस आणावी व आपणास असे विचारावें कीं, रेसिडेंट व मनमध्ये असा बेचनाव असल्यामुळे पुढे त्यांचे हातून चां- गली व निष्पक्षपाताची वर्तणुक होईल की काय; परंतु कर्नल फेर साहेबांवर आपा पूर्ण भरंवसा आपण प्रदर्शित केल्यामुळे मी तसे केले नाही व माझी अशी आशा होती की, आपला सला मिळाल्यावर कर्नल साहेब मागचें सर्व विसरतील व सुधारले- ली राज्यव्यवस्था स्थापन करण्याचे कठीण कामांत मला पूर्ण मदत करतील; परंतु मी फार दुःखानें आपल्यास कळवितों कीं, गेल्या तीन महिन्यांचे अनुभवावरून ही माझी आशा खरी झाली नाहीं येवढेच नाहीं, परंतु कर्नल साहेबांचे वर्तणुकीत मी व माझ्या राज्यव्यवस्थेबद्दल अधिक द्वेषभाव दिसून येतो. मला जो पाहिजे तो दिवाण नेमण्याची मोकळीक असावी ह्या गोष्टीस कर्नल साहेब पहिलेपासून विरुद्ध आहेत. यांनी माझे दिवाणास मागून दिलेल्या अभि वचनापासून माझे मनांत कांहीं आशा उत्पन्न झाली होती; परंतु ती आशा सिद्धीस गेली नाहीं. आपलेकडून खलिता आल्यावर ज्या गोष्टी करणे जरूर होते त्या गोष्टी करण्यास मीं लागलींच सुरवात केली व तेव्हांपासून मी त्या सल्याप्रमाणे वर्तन कर व्यास झटत आहे. इतर गोष्टी करतांना पहिल्याने राज्यव्यवस्था चालवण्यास हुशार व अनुभवशीर मनुष्य नेमण्याची जरूर आहे व ज्या सरदारांच्या हक्काकडे इंग्रज सरकार चें लक्ष पोंचलें आहे त्याची व हल्लीं चालू असलेली वसुलाची चौकशी करण्याचे कामास ह्या वरील मनुष्याची फार जरूर आहे. ही प्रत्येक गोष्ट करण्यास किती अडचण आहे हे सर्वांपेक्षां रेसिडेंट साहेबांस फार चांगले माहीत आहे. व ही अडचण ह्या सर्व गोष्टी थोडक्या वेळांत करणे असल्या मुळे विशेष ज्यास्ती झाली आहे. कर्नल फेर व भी ह्यामध्यें पूर्वी बेबनाव असल्यामुळे लोकांच्या मनाची बिघडलेली स्थिति ते येथे रोतेडेंट असल्यामुळे सुधारत नाहीं. व ती सुधारण्यांत त्यांनी मला उघड रीतीने व मनापासून आसरा दिला पाहिजे, ह्या सर्व विचारावरून त्यांच्या वर्तणुकीने माझ्यावर अधिक संकटें उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत माझी चौकशी न्यायानें होईल की काय याचा निर्णय करण्याचें काम आपल्याकडे मी मोठ्या जुलमानें आणीत आहे. माझ्या तक्रारीस बळकटी येण्याकरितां मी एक दोन उदाहरणे लिहितों. माझ्या सासमानें चांदेराव खंडू नांवाच्या एका शिलेदारावर अब्रू घेतल्याबद्दल. कांही दिवसांपूर्वी फिर्याद केली होती. खुद्द माझ्या दिवाणांनी समक्ष या खटल्यांतील कच्या चौकशीची हकीकत वाचून दाखविली. व दोन्ही पक्षकारांस निःपक्षपाताचा न्याय मिळावा ह्मणून ह्या खटल्याचे काम माझे नातेवाईक सेनापती यांजकडे न सोपवितां मि० एच. ए. वाडिया चीफ