पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विण्यास महाराजांस अधिकार नाहीं असें असतां कडू यांजवर समन्स बजाविण्याचा प्रयत्न केला तर आझी देहांत जीव आहे तोपर्यंत त्यांचा बचाव करूं. महाराजांनी आपल्या दिवाणास रोसडेंट यांजकडेस पाठविलें; अशा आशेनें कीं, ते आपढ़ें वजन खर्च करून त्या लोकांचा जमाव मोडून टाकतील; परंतु त्यांत महाराज निराश झाले. रोसडेंट यांनी त्या लोकांचा पक्ष घेतला. त्या लोकांनी जें कारण सांगितलें तेंच रोसडेंट यांनी सांगितलें आणि चंद्रराव कडु यांजवरील आरोप काढून घेतल्यावाचून ते आपला जमाव मोडणार नाहींत असे स्पष्ट दि बाण यांस कळविलें. मुंबईसरकार यांसही कर्नल फेर यांनी त्याचप्रमाणे लिहिलें. रखमाजीराव यांचे येथें भोजनास जाण्याविषय मराठे सरदारांनी कबूल केले नाही ह्मणून कोणींकडून तरी त्यांचा नाश करावयाचा महाराजांचा हेतु आहे असे कळवून या दंग्याचा उपशम न होईल तर दसऱ्याच्या स्वारींत लष्करी मान देण्याकरिता आपण जाऊं नये असा मुंबईसरकारचा हुकूम मिळवून ठेविला. तेव्हां अर्थात महाराजांस नाक मुठींत धरून त्या लोकांस सांगावें लागले कीं, आह्मी चंद्रराव कडू यांजवर काम चालवि- णार नाही आणि या माफीस असें रूप आणिलें कीं, महाराजांस पुत्र झाला तो म होत्सवमसंग ध्यानांत घेऊन महाराज कडू यांस क्षमा करितात; तेव्हां सरदार आ णि शिलेदार लोकांनी अशी आट धरिली कीं, आमच्या नेमणुकीचा चढलेला सर्व पैसा दिल्यावांचून आक्षी आपला जमाव मोडणार नाहीं व दसऱ्याच्या स्वारीस येणार नाही; परंतु पुढें तो आग्रह त्यांनी सोडून दिला आणि दसऱ्याचा समारंभ सांप्रदा- याप्रमाणे झाला. महाराजांचा दरजा आणि अधिकार याजमध्ये तिळमात्र देखील कमीपणा येऊं देऊं नये ही गवरनर जनरलची सूचना जो रेसिडेंट ह्याममाणे तुच्छ मानीत होता तो बडोद्याच्या दरबारांत राहिला असता त्या राष्ट्रांतील लोकांमध्ये आणि राजामध्यें सख्य होऊन राज्यकारभार सुयंत्र चालेल अशी आशा बाळगण्यास कांहीं जागा नव्हती. पण मुंबईसरकारास कर्नल फेर यांच्या हितापेक्षां बडोद्याच्या राष्ट्राच्या हिताविषयीं कळकळ फार कमी होती. सांगण्याचें तात्पर्य एवर्ढेच आहे कीं, कर्नल फेर यांजबद्दल मुंबई सरकार यांजवळ आपली दाद छागेल अशी महाराजांनी आशा बाळगण्याजोगें कांहीं नव्हते; सबब यांनीं व्हाइसराय साहेब यांस तारीख २ नवंबर सन १८७४ रोजी एक खलिता लिहिला तो असा:- राइट आनरबल टामस जार्ज बोरंग ब्यारन नार्थब्रूक जी. एम. एस. आय. व्हाइसराय व गवरनर जनरल कलकत्ता यांस. आपलेकडून तारीख २५ जुलई १८७४ इसवीचे आलेल्या खलियापूर्वी ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यांवरून असे स्पष्ट दिसून येतें कीं, जर रेसिडेंट साहेबांनी