पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (११३) कसा ! ! त्यांनी कर्नल फेर यांस त्याबद्दल टपका दिला.* 'तुझांस रखमाबाई. खेरीज कोणाविषयीं पत्रव्यवहार करूं नये असा हुकूम दिला असतां तुझीं सर्व स्त्रियां- विषयीं पत्रव्यवहार केलात. त्यांत कोणाचे नांव लिहिले नाहींत एवढ्यानें तुर्की सर- कारघ्या हुकुमाची अमान्यता केली नाहीं असे होत नाहीं' अर्से कर्नल फेर यांस त्यांनी कळविले; पण कर्नल फेर यांच्या या अतिक्रमाबद्दल मुंबई सरकारांनीं हिंदु- स्थान सरकारास कांहीं देखील लिहिलें नाहीं. हो कर्नल फेर यांची आपल्या वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे वागण्याची रीत. लार्ड नार्थब्रूक साहेब यांच्या दरबारासाठी महाराजांनी अवश्य गेलें पाहिजे अ शी दादाभाई यांनी सला दिली असतां व त्यांचे सर्फे एजंट होऊन विलायतेस जा. ण्याचा त्यांनीं पतकर घेतला नसतां त्यांजवर तसा दोष ठेवून आपल्या सरकारास ती गोष्ट तशीच आहे असें बेलाशक कळविणे हा कर्नल फेर यांचा सत्यवादीपणा!! तुझी जर दादाभाई यांस दिवाण नेमाल तर तुमच्या व माझ्यामध्ये तंढा सुरू हो. ईल अशी महाराजांस धमकी देणे, ही त्यांची सलामसलत देण्याची पद्धत आणि महाराजांची सत्ता हिसकावून घेण्याविषयीं सरकारास शिफारस करणे हे त्यांचे महाराजांबरोबरील प्रेमभावाचे आणि मित्राचारीचे वर्तन; व 'तुझी स्वतः राज्यकार भार चालविण्याचा आव घालं नका असा गवरनर जनरल यांनी उपदेश केला त्याजविषयीं आज्ञाधारकता ! ! ! , दादाभाई यांस दिवाणगिरीचीं वस्त्रे दिल्यानंतर चंद्रराव कडु यांच्या संबंधाने बडोद्यांत एक मोठे तुफान झालें होतें. महाराजांचा सासरा रखमाजीराव जाधव यांजवर त्यांनीं कांहीं भलताच अपवाद ठेविला होता असा त्यांजवर आरोप होता. व त्याबद्दलची सेनापतीपुढे चौकशी व्हावयाची; परंतु ते महाराजांचे आप्त सबब शहर फौजदार यांजपुढे चौकशी व्हावी असा महाराजांनी हुकूम दिला होता. चंद्रराव कडु लागलींच बडोदें सोडून कापांत गेला. तेथे काय झालें हें सांगू श कवणार नाहीं; परंतु लागलींच काही वेळाने सरदार, शिलेदार, आणि त्यांचे अनु- यायी असे शे दोनशें लोक त्यांच्यापैकी एका सरदाराच्या येथे एकत्र झाले आणि चंद्रराव कडु यांस पकडण्याचा प्रयत्न करण्यांत येईल तर खुनरेजी होईल असे भय घालून दरबारचा अधिकार तुच्छ मामिला. एकत्र झालेल्या लोकांनी समन्स ब जाविण्यासाठी गेलेल्या दरबारच्या अधिकाऱ्यांस असे सांगितले कीं, चंद्रराव यांज- वर जो आरोप आणला आहे तो ज्ञातीसंबंधी आहे; सबब त्याजबद्दल काम चाळ-

  • “ His Excellency in Council regrets that he cannot accept your explanation

as satisfactory. Having been directed by Government to make no communication to the Gackwar, or to the Durbar about any lady, except Her Highness Rukmsbace, without previous consultation with Government, you made a communication about all the ladies. Your omission to mention names in no way alters the fact of your direct disregard of the orders of Government which did not admit of such misconstruction." (Blue Book No. 4 Page 42.) १२