पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज यांच्या मंडळीचा उत्कर्ष. (१७) आपले हित इच्छितात हेच त्यांचे आपणावर मोठे उपकार आहेत असे महाराजानी मानिले. ह्या गोष्टी कांहीं क्षुद्र मनाच्या मनुष्यापासून घडावयाच्या नाहींत. नाना प्रकारची कुकर्मे करून द्रव्य संचय करणे, त्याचा आपल्या स्वताच्या व परिवाराच्या सुखार्थ व्यय न करितां जन्मभर दुःख भोगणें आणि मरतेसमयीं आतां आपल्यास या संचित धनास सोडून परलोकास जावे लागतें म्हणून रडणे असे ह्या जगांत पुष्कळ पुरुष झाले आहेत. गिझनीचा महमद सुलतान याणे हिंदुस्थानवासी लोकांस नागवून अपरिमित द्रव्य अफगाणिस्थानांत नेलें, आणि मरतेसमयीं तें सर्व आपल्यासमोर आणवून आतां त्याचा व आपला वियोग होणार म्हणून मोठ्याने रडला, परंतु गायकवाड यांच्या घरा- ण्यांतील पुरुषांकडे पाहिले असतां त्यांच्यांत कोणीच कृपण नव्हता, आणि त्यांत खंडेराव महाराज व मल्हारराव महाराज यांची औदायें तर मर्यादेपलीकडे गेली होती. ३.