पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१०७) लिहिलें. गायकवाडांनीं तारीख १७ आगष्ट रोजी कामदार लोक मागितले व त्यानंतर तारीख १२ सप्टेंबर रोजी तुमच्या ठरावावर अपील केले असतां तुझी त्यांजवर कांहीं एक ठराव न करितां ते नुस्ते कागद तुमच्या पत्ताबरोबर तुर्की आझां- कडेस पाठवून दिलेत. तारीख २५ जुलई सन १८७४ च्या पत्रांतील सातव्या कळमांत सुचविल्याप्रमाणे ज्याचा परिणाम फलद्रूप होईल असे तुझीं कांहीं केलें नाहीं. जे लोक गायकवाडांनी मागितले होते त्यांचे अनुमतीची कांहीं गरज नव्हती. तुझी त्यांस पाठविण्यास उत्सुक आहांत असे त्या लोकांस कळविले असते तर त्यांनीं ती गोष्ट कबूल केली असती. गायकवाडांनीं त्या संबंधानें जो कांहीं ठराव करणें उचित वाटेल तो तुझीं करावा असे देखील सांगितले होतें. प्रसंगी गायकवाड यांस मनःपूर्वक साह्य द्यावयाचे होते. हा विलंब होऊं दिला यांत गायकवाडांची हिंमत खचविण्याची चिन्हें आहेत; पूर्वक मदत द्यावी. जर तुमच्या जवळ योग्य गुणांनी युक्त कामदार नसतील तर इंडिया सरकार आपल्या ताब्यांतील लोक पाठविण्यास उत्सुक आहेत. गव्हरनर ज.. नजरल असा भरंवसा ठेवतात कीं, मुंबई सरकार आपल्या मंत्र्यांसह बडोद्याचे राज्य बळकट आणि खातरजभेच्या पायावर स्थापित करण्यास्तव अंतःकरणपूर्वक सहाय्य करतील. असा एकंदर त्या पत्रातील सारांश आहे. अशा यासाठीं तुझी त्यांस मनः- या पत्राचें मुंबई सरकारांनीं तारीख ३० आक्टोबर सन १८७४ रोज नंबर ३८ चें उत्तर पाठविलें. त्यांत त्यांचे म्हणणे असे आहे कीं, 'तारीख २५ जुलई सन १८७४ च्या पत्रांतील सातव्या कलमांत ब्रिटिश सरकारच्या नौकरींतील लोक गायकवाडांनी मागितले असतां द्यावे', असे लिहिले आहे. त्याचा अर्थ असा स मजण्यांत आला नाहीं कीं, त्या लोकांची मर्जी नसतां ही त्यांस पाठविण्यांत यावे. प्रयत्न करण्यांत यावा असे लिहिले आहे. त्याचा अर्थ असा होतो कीं, त्या लोकां- चें काम करण्यासाठी दुसरी व्यवस्था करून त्यांस गायकवाडाची चाकरी करण्या- ची मोकळीक द्यावी त्याप्रमाणे आह्मी आमच्या गैरसोयीकडेस अलक्ष करून लागलींच त्या लोकांस परवानगी दिली आणि त्यांचा त्यांचे जागेवर एक वर्षपर्यंत हक्क ठेविला. हा आह्नीं योग्य प्रयत्न केला असतां गवरनर जनरल यांस असें The Governor-General in Council cannot but regret the delay that he fears, from the information before him, has been allowed to take place in this matter; & delay which is not calculated to encourage the Baroda Durbar in introducing or pre- serving in those necessary reforms on which so many interests depend. The Governor- General in Council expects that the help of the Bombay Government will be cordially and actively given to the Durbar whenever this can properly be done. If there be no properly qualified officers under the Bombay Government willing to assist in the reform of the Baroda Administration, the Governor-General in Council will be prepared to depute officers serving under the Government of India. His Excellency in Council relies with confidence upon the cordial co-operation of His Excellency the Governor of Bombay in Council in his efforts to place the Baroda Administration on a sound and satisfactory footing." (Blue Book No. 4 Page 73.) ब्ल्यू बुक नंबर ४ पान ७४ पहा.