पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वाटलें कीं, त्यांचे हुकूम अमलांत आणण्यास योग्य तत्परता ठेविली नाही. त्यांचें म्हणणे असें आहे कीं, मागितलेल्या कामदार लोकांस आम्ही हुकूम देऊन विशेष कामासाठी ह्मणून पाठवावयाचे होते. परंतु आह्मीं जो त्यांच्या हुकुमाचा अर्थ केला आहे त्याहून निराळा अर्थ करण्यास आह्मी शक्य नाही. गवरनर जनरलच्या हुकूमाचा अर्थ मुंबई सरकारांनीं बरोबर केला नाहीं असे झणण्याची आपणांस गरज नाहीं. राज्यव्यवस्थेमध्ये सुधारणूक करण्याचे कामांत गायकवाड यांस त्यांच्या प्रयत्नांत आपण पराकाष्ठेची मदत केली पाहिजे अशी गवरनर जनरल यांनी मुंबईसरकारास आपली इच्छा स्पष्टपणे जाणविली होती. गा यकवाडांनी मागितलेल्या कामदारांची बडोद्याच्या दरबारांत चाकरी करण्याची मर्जी असेल तर त्यांनी जावें आणि त्यांच्या जागेवर एक वर्षपर्यंत त्यांचा हक्क ठे- विण्यांत येईल असा ठराव केल्याने गवरनर जनरल यांची उत्कट इच्छा पूर्ण के. ल्याचे श्रय येत असेल, तर त्याबद्दल काही तक्रार नाहीं. परंतु गायकवाडांनीं या. विषयों पुनः विचार करण्यासाठी मोठ्या कळकळीने विनवणी केली असतां व प्रत्ये- क घटका महत्वाची आहे असे जाणविले असतां, मुंबई सरकारांनी हे प्रकरण आप ल्या दफ्तरांत तीन आठवड्यांहून जास्त दिवसपर्यंत टाकून ठेविले, यांत त्यांनी गा- यकवाडांच्या कळकळीच्या विनयपूर्वक विनंतीकडे लक्ष देण्यामध्ये पराकाष्ठेची हय- गय केली नाही, असे ह्मणण्यास जागा नाहीं. गवरनर जनरल यांजपुढे हें प्रकरण गेल्याबरोबर त्यांस ही गोष्ट इतकी महत्वाची आणि जरूरीची वाटली कीं, त्यांनीं कामदार लोकांस तात्काळ पाठविण्याबद्दल मुंबई सरकारास तार पाठविला. पो- ष्टांतून पत्र पोहोचण्यास लागणारा विलंब देखील त्यांस सहन झाला नाही. याप माणे मुंबई सरकारांनी गवरनर जनरल यांस तार पाठवून त्यांच्या हुकुमाचा वास्तवि क अर्थ काय आहे व गायकवाडांच्या विनयपूर्वक विनंतीबद्दल काय करावयाचें याबद्दल कां बरें विचारले नाहीं ? दिलेल्या मुदतींत गायकवाड यांनी आपले राज्यांत सुधारणा केली हे पाहण्यास गवरनर जनरल खरोखर फार उत्सुक होते, आणि त शी गोष्ट घडून आली असती तर लार्ड नार्थब्रूक यांस गायकवाडांस क्षमा करून त्यांस जी संधी दिली तिचें सार्थक झाल्याबद्दल पराकाष्ठेचें समाधान वाटले असतें. वर लिहिलेल्या ता० २० आक्टोबरच्या पत्त्राच्या शेवटचें वाक्य वाचलें म्हणजे आनंदाश्र नें नेत्र भरून येतात ! मल्हारराव महाराज यांचें राज्य बळकट आणि खातरजमेच्या पायावर स्थापित करण्याच्या कामी आह्मांस तुम्ही मनःपूर्वक सहाय्य करण्याविषयीं नार्थब्रूक यांनी किती बरें विनययुक्त शब्दांनी मुंबई सरकारास विनंति केली होती; परंतु मुंबई सरकाराची गायकवाडाकडे जितकी नेक नजर पाहिजे होती तितकी नव्हती. यामुळे पुढे अशी कांहीं विलक्षण गोष्ट घडून आली कीं, लार्ड नार्थब्रूक यांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. सदहू पत्रांतील सहाव्या कलमावरूनच गवरनर जनरल आणि मुंबई सरकार यांच्या विचारांमध्ये किती अंतर होतें तें समजून येते. गायकवाड यांस जर आपण