पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्यपरिणाम. (१०५) वे गुमास्ते लोकांस स्पष्ट सला देत असत कीं, रेसिडेंट साहेब यांच्या रुकारावांच- न परभारें तुझीं आपल्या फिर्यादीचा निकाल करून घेऊं नये. सरदार लोकांपैकी काही लोकांनी दादाभाईबरोबर तोडजोडीनें निकाल करून घेण्याचें कबूल केल्या- बरोबर त्यांस रेसिडेन्सीच्या बंगल्याची पायरी चढण्याची मनाई झाली, आणि जे. व्हां कबूल केलेली तोडजोड़ त्यांनीं अमान्य केली तेव्हां त्यांचा पुनः कर्नल फेर यां- च्या कृपेंतील मंडळींत प्रवेश झाला. फिर्यादी जे मागेल तें त्यांस दिले तरच समाधानावर गोष्ट यावयाची होती आणि ती गोष्ट तर सर्वथैव अशक्य होती. अशा प्रकारच्या कर्नल फेरच्या वर्तनाने दा- दाभाई आणि त्यांचे सोबती अगदीं वासले आणि शेवटचा उपाय काय तो एवढा- च उरला कीं, कर्नल फेर यांस रेसिडेंन्सीचे हुद्यावरून काढण्याविषयीं गवरनर ज नरळ यांस विनंति करून पाहावी. बडोदे दरबारचा संबंध मुंबई सरकाराशीं हो- ता; परंतु ते कर्नल फेर यांजविषयों आपढ़ें गाहाणे लक्षपूर्वक ऐकणार नाहीत अशी पुष्कळ प्रमाणांवरून दरबारची खात्री झाली होती आणि तीस योग्य प्रमाणें होतीं. गवरनर जनरल यांनी मुंबई सरकारास तारीख २५ जुलई सन १८७४ रोजी नंबर १५८६ चें पत्र लिहिले. त्यांतील सातव्या कलमांत असे लिहिले आहे कीं, गायकवाडास पूर्ण संधी दिल्यावांचन व त्यांच्या प्रयत्नांत त्यांस पर काष्ठेची मदत के- ल्यावांचून त्यांच्या अधिकारांत फेरबदल करण्यास गवरनर जनरल इच्छीत नाहींत. यासाठी गायकवाडांनीं ब्रिटिश सरकारच्या नौकरींतील लोक मदतीसाठीं मागितले तर त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरितां प्रयत्न करण्यात यावा, आणि जे लोक ते मा- गतील ते सांस द्यावे. या वरील वाक्यांत ' त्यांस पराकाष्ठेची मदत केल्यावांचून' हे शब्द आहेत त्या- वरून मुंबई सरकार यांनी गायकवाड सरकार यांस राज्यांत सुधारणूक करण्यासा- ठी किती मनःपूर्वक मदत केली पाहिजे होती, हे चांगले कळते; परंतु त्याप्रमाणें व्यांजकडून झाले नाहीं. दादाभाई यांनीं आपल्या मदतीकरितां ब्रिटिश सरकारच्या नौकरींतील शंभु. प्रसाद, पेस्तमजी जाहांगीरजी, शंकर पांडुरंग पंडित आणि तीन अनुभवी मामलेदा र असे लोक मागितले आणि त्यांच्या पगाराबद्दल मुंबई सरकारास योग्य वाटेल तसा ठराव करावा म्हणून विनंति केली. त्यावर मुंबई सरकारांनी तारीख ७ सप्टें- बर सन १८७४ रोजी असा ठराव केला की, त्या कामदारांबरोबर दरबारांनीं पर. भारें बोलाचाल करावी. आणि ते जर बडोद्याच्या दरबारांत चाकरी करण्यास खुषी असतील तर त्यांच्या जागेवर त्यांचा बारा महिनेपर्यंत हक्क कायम ठेवून पाठवि ण्यांत येतील. या ठरावाने दादाभाई यांची उमेद खचली. त्यांनीं तारीख १२ सप्टेंबर सन ब्ल्यू बुक नंबर १ पान ३५४ पहा.