पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ते व त्यांनी ही दादाभाई यांस आश्वासन दिले होते; परंतु तें सर्व व्यर्थ. 'दादा- भाईकुं हम थोडे दिनमे गिराइगा ' ही जी त्यांनी प्रतिज्ञा केली होती ती शेवटास नेण्याचा त्यांचा दृढ निश्चय तिळमात्र ढळला नव्हता. प्रांतांतील लोकांवर जुलूम होत आहेत, लष्करी लोकांचे पगार न दिल्यामुळे राज्यांत फंदफितुर होण्याची चि न्हें दिसू लागली आहेत, इंग्रज सरकारच्या रयतेवर जुलूम होत आहेत आणि क मिशनांनीं केलेल्या शिफारसी अमलांत आणण्यास मुद्दाम टाळाटाळी करण्यांत येत आहे, वगैरे प्रकारचीं रोसडेंट साहेब यांचीं गान्हाणीं मुंबई सरकाराकडेस चालू होती व त्यांबद्दल दरबारांत यादी पाठवून भयप्रदर्शन करण्याचा क्रम सुरू होताच. एकच गोष्ट वारंवार सांगितली असता ती खोटी असली तरी सरतेशेवटीं खरी हो- ते असाच कर्नल फेर यांचा समज होता असे दिसते. सर रिचर्ड मीडच्या क- मिशनापुढे इंग्रज सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दल व इंग्रज सरकाराबरोबर केलेले करारमदार मोडल्याबद्दल कर्नल फेर यांच्यानें कांहीं पुरावा झाला नाहीं. मुख्यत्वेकरून ज्या गोष्टींसाठीं तें कमिशन नेमण्यांत आळें होते त्या गोष्टी खऱ्या न झाल्यामुळे कमिशन नेमण्याचा प्रधान हेतु निष्फळ झाला असतां त्याच त्या गो- ष्टींबद्दल कर्नल फेर आपणास लिहितात काय आणि आपण त्यांचें ऐकतों काय याविषयीं मुंबई सरकारांनी देखील काही मनांत आणिलें नाहीं. i कमिशनच्या प्रकरणांत आम्हीं बहुतकरून पुष्कळ मुकदम्यांत असे ही निदर्शनास आणून दिले आहे की, फिर्यादी यानी जे काहीं दावे कले हाते ते कर्नल फेर यांस खरे वाटले व त्याबद्दल कमिशनास पुराव्यावरून जे कांहीं दिसून आले ते त्यांस रु. चलें नाहीं. आपल्या नेमणुकी वंशपरंपरा चालविण्याकरितां राबर्टच्या रिसाल्या- बद्दल तीन लाख रुपये इंग्रजसरकारांनी माफ केले आहेत असे सरदार व शिलेदार लोकांचे म्हणणे होते तें कर्नल फेर यांस मान्य झाले होते व त्याबद्दल कमिशनांनीं- पुरावा घ्यावा असे आग्रहपूर्वक ह्मणणे होते. त्याचप्रम माहकाठचांतील सं स्थानिकाप्रमाणे आपणही घासदाण्याबद्दल खंडणी देणाऱ्या वर्गातील आहोत असे विजापूर परगण्यांतील ठाकूर लोक ह्मणत होते. आणि ते त्यांचे म्हणणे खरें आहे असा कर्नल फेर यांचा दृढनिश्चय होता. फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे बेलाशक निवाडा देणाऱ्या न्यायाधीशाबरोबर दादाभाईचा संबंध जडला होता व दुसऱ्या शब्दाने म्हटलें तर जो फिर्यादी तोच न्यायाधीश होता आणि त्याच्या विचाराने क. मिशन याजपुढे झालेल्या फिर्यादीचा दादाभाई यांस निकाल करावयाचा होता.

  • सरदार, शिलेदार, आणि दुसऱ्या लोकांनी दादाभाईकडेस यावें आणि आ.

पल्या इच्छेस येईल तें त्यांजपाशीं मागावें आणि ते त्यांनीं कबूल केलें नाहीं कीं लागलींच रेसिडेंट साहेब यांजकडेस जाऊन आपली फिर्याद कोणी दरबारांत ऐक- त नाहीं असा बोभाटा करावा, असा क्रम चालू होता. भाऊ पुणेकर आणि त्या- दादाभाई यांनी छापलेल्या बुकाचें पान - पहा.