पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्पांस असे कळविलें कीं ' यासंबंधानें तुमचें ह्मणणे मनस्तोषकर नाहीं; यासाठी याबद्दल तुझी आतां सरकाराबरोबर कहीं लखापढी करूं नये, तरी दादाभाई यांस फजित करून बडोद्याच्या दरबारांतून काढून द्यावें हें जें कर्नल फेर यांच्या मनांत एकदा भरले होतें तें होतेच; त्यांत काहीं पालट झाला नाहीं. गवरनर जनरल यांच्या हुकुमाकडेस बुद्धिपुरःसर अलक्ष करून कर्नल फेर वागत आहेत असें मुंबई सरकाराच समजुतीस येण्यांत कांहीं बाकी राहिली नव्हती.. परंतु त्याजवर त्यांची परम कृपा होती आणि गायकवाडांच्या राज्याच्या हितापेक्षां क_ र्नल फेर यांच्या हिताकडे त्यांचे विशेष लक्ष होतें यामुळे परिणाम फार वाईट झाला. तारीख १७ सप्टेंबर सन १८७४ रोजी मुंबई सरकारांनी इंडियासरकारास पत्र लि. अहिले आहे त्यांत कर्नल फेरचें अन्यथा वर्तन इंडिया सरकारचे ध्यानात यावे अशा " रीतीने खुलासेवार कांहीं लिहिले नाही. एखाद्याचें दोषगोपन करण्यासाठी मुद्दाम खरा मजकूर कळविण्यांत जशी टाळाटाळ करण्यांत येते तशा रीतीचा त्या पत्राच्या लेखाचा एकंदर झोंक आहे. मुंबईचे गवरनर आणि त्यांचे मंत्री सुशिक्षित, नयज्ञ आणि नियंत्रित आणि म ·ल्हारराव महाराज अशिक्षित, अनयज्ञ आणि विशृंखल या भेदामुळे मुंबईसरकारच्या आणि मल्हारराव महाराज यांच्या कृत्यांमध्ये सर्वांशीं साम्य कसें असं शकेल; परंतु मल्हारराव महाराज यांनी खानवेलकर यांचा पक्ष धरल्यामुळे जो परिणाम बडोद्या- च्या राज्यावर घढला तसाच मुंबईसरकारांनी कर्नल फेरचा पक्षपात केल्यानें घडला. मुंबई सरकारांनी सदहू पत्तांत खानवेलकर यांस प्रतिनिधी नेमिण्याविषयीं व दा- दाभाईचे दिवाणगिरीविषयीं कर्नल फेर यांनी हरकत घेतल्याबद्दल मजकूर तर लिहि- ला आहे; पण त्यावरून कर्नल फेर यांचे कृत्य दोषास्पद आहे असे गवरनर जनरल यांच्या ध्यानांत यावे अशी शब्दरचना नसून, कर्नल फेर यांचें आचरण अन्यायाचें आहे व त्याबद्दल आपण त्यांस टपका दिला आहे या संबंधाने त्या पत्रांत एक शब्द देखील नाहीं. ‘ गायकवाडांनीं रेसिडेंट यांस पूर्वी सला विचारिली तेव्हां दादाभाई- च्या लायकीविषयीं त्यांचें मत इतकें प्रतिकूळ पडलें कीं, मुंबई सरकारास रेसिडेंट यांजकडून गायकवाड सरकारास असे कळविणे भाग पडले की जर गायकवाड स्वतंत्रतेनें दादाभाई यांस दिवाण नेमीत असतील तर त्यांत सरकारची कांहीं हरकत. नाहीं' या अर्थाचें सदई पत्रांत एक कलम आहे; त्यांत इतकेच प्रदर्शित केले आहे. कीं, दादाभाईविषयीं महाराजांनीं रेसिडेंट यांची खानगी सला विचारिली आणि त्यांनी त्यांच्या लायकीविषयीं प्रतिकूळ अभिप्राय दिला. रेसिडेंट यांनी दादाभाई यांस दिवाणगिरीवर नेमू देऊ नये अशी आपणास आग्रहपूर्वक शिफारस केली व आम्ही त्याजबद्दल त्यांस टपका दिला असतांही त्यांनी आपले करणे रास्त आहे असे स्थापित करण्याचा प्रयत्न केला; व शेवटी त्यांस त्याबद्दल कांहीं लखापढी करूं नये असें निक्षून सांगणें भाग पडलें या संबंधानें एक शब्द देखील त्या पत्रांत नाहीं.