पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१०१) सलें तें मी त्यांस सांगितलें असें करण्यांत तर मीं गवरनर जनरलचा हुकूम मानला आहे. यांत माझे कांही एक गैरवर्तन नाही. पण त्याहून उलट भी मोकळ्या आ- णि थोर मनानें सला देऊन गायकवाडास मदत केली आहे. जर मीं सला दिली नसती तर तिकडूनही गायकवाडास गाहाणे सांगण्यास कारण झाले असते. आतां दादाभाईविषयी माझ्या अधिकाराच्या नात्यानें मीं जो अभिप्राय दिला आहे त्यास सरकारी दफ्तरचीं प्रमाण आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यांत दादाभाई बडोद्यास आल्यावर त्यांनीं कमिशन नेमिण्याच्या अधिकाराविषयी तक्रार घेतली आणि आठ महिने झाले, क मेशनच्या शिफारसी अमलांत आणण्यास टाळाटाळी करीत आहेत; त्यावरून राज्यामध्ये जी टिकाऊ सुधाणूक करण्याविषयीं गवरनर जनरल इच्छीत आहेत ती त्यांच्या हातानें होईल असे मला दिसून येत नाही. सदहू रिपोर्टाचे शेवटीं त्या शूर सरदाराने मुंबई सरकारांनी त्याची परोपरीने का नउघाडणी केली असतांही दादाभाईच्या दिवाणगिरीचाच नाहीं, पण मल्हारराव महाराज यांच्या कारकादर्दीचा परिणाम काय होईल याविषयींचें देखील भविष्य क थन करून टाकिलें.

  • कर्नल फेर साहेब म्हणतात 'मी विनयपूर्वक सुचवितों कीं सदरील मत द-

शीवल्यापासून मुद्याच्या तक्रारीचा अखेर निकाळ होण्यास कोणत्याही तऱ्हेनें बाघ येणार नाही. कारण माझे मत कसेंही असो, ज्या कांहीं गोष्टी नि: संशय घडून आल्या आहेत त्यांची एकंदर माळची माळ थोड्या महिन्यांत आपल्या दृष्टीपुढे येईल. व त्यापासून असंही निदर्शनास येईल कीं, कमिशनांनीं केलेल्या शिफारसी आणि सुचविलेल सुधारणुकांचे उपाय खरोखर अमळांत येत आहेत किंवा नाहीत; आणि माझ्या मताव्यतिरिक्त केवळ घडून आलेल्या गोष्टींच्या आधारावरच सरका- रचा शेवट ठराव अवलंबून राहणार आहे. आप ह्मणणे खरें करण्यासाठी कोणत्या गोष्टी घडून आणाव्या हें कर्नल फेर यांच्या हातांत होते. अर्थात आपल्या मताव्यतिरिक्त केवळ घडून आलेल्या गोष्टीं- वरच सरकारचा शेवट ठराव अवलंबून राहणार आहे असा निष्पक्षपातीपणाचा त्यांनी डौल घातला तो ठीकच होता. कर्नल फेर यांनी आपल्यावरील दोष उडविण्यासाठी केलेला प्रयत्न जरी सफल झाला नाहीं, आणि मुंबई सरकारांनी तारखि ७ सप्टेंबर सन १८७४ च्या पत्राने

  • “I respectfully submit that this expression of opinion cannot possibly pre-

judice the ultimate settlement of the question at issue one way or other; because independently of it an unquestionable array of facts will present themselves in a few months, showing whether the requisite reforms and the recommendation of the com- mission are really in course of being effected or not, and on those facts, and those alone, not on auy mere opinion of mine, the ultimate verdict of Government will mainly depend." (Blue book No. 4 Page 38, Section 13.) + ब्ल्यू बुक नंबर ४ पान ४१ पहा.