पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कारण असे दिसतें कीं, मल्हारराव महाराज यांस त्यांच्या अधिकाराच्या चिरस्थाईपणा- विषयों संशय उत्पन्न झाला होता, व त्यास योग्य सबब होती. राणी साहेब जमनाबाई गरोदर आहेत हा निश्चय झाला होता, आणि त्यांस पुत्र झाला असतां महाराज यांचा राज्यावर काहीएक हक्क नाहीं हे ठरून चुकले होते. जमनाबाई साहेब यांस पुत्र झाला असतां तो मोठा होईपर्यंत राज्य प्रतिनिधीपणाचा अधिकार मल्हारराव महाराजांचा होता, आणि गायकवाडाच्या घराण्यांतील राजकुलोत्पन्न पुरुषांस तो विशेषेकरून लागू होता; कारण कीं, दमाजी गायकवाड यांचे वडील पुत्र सयाजी महाराज मनाने विकल असल्यामुळे त्यांचा राज्यकारभार त्यांचे कनिष्ट बंधु फत्तेसिंगराव महाराज याणी व ते गत झाल्यावर गोविंदराव महाराज याणी राज्य प्रतिनिधी या नात्याने चालविला होता. त्याचप्रमाणे आनंदराव गायकवाड अकलेने दुर्बळ असल्यामुळे त्यांचा राज्यकारभार त्यांचे बंधु फत्तेसिंगराव याणी चालविला होता, परंतु मल्हारराव महाराज याणी त्याविषयी आशा करावी अशी त्यांची वर्तणूक नवती. खंडेराव महाराज यांजबरोबरचें मल्हारराव महाराज यांचे पूर्वीचे वर्तन व खंडेराव महाराज मरण पावल्यावर त्यांच्या मंडळीवर केलेले जुलूम यावरून खंडेराव महाराज यांच्या पुत्राचे राज्य चालविण्यास मल्हारराव महाराज यांची नालायकी ठरून चुकली होती. खंडेराव महाराज यांस पुत्रसंतति व्हावी अशी त्यांच्या प्रजेची फार इच्छा होती ती पूर्ण न होतां खंडेराव वारले यामुळे लोकांची निराशा झाली होती, परंतु त्यानी जमनाबाई साहेब गरोदर आहेत हे अद्भुत वर्तमान ऐकिलें तेव्हां त्यांस खरोखर असेच वाटले की, मल्हारराव यांच्या कपाळी राज्यसुख म्हणून नाहींच जमनाबाई यांस खास पुत्रच होणार. तसेंच मल्हारराव यांस वाटले असले तर त्यांत नवल नाहीं; कारण की, आपण एक दुर्दैवी प्राणी आहोत असे त्यांस वाटावे असे त्यांजवर प्रसंग गुजरले होते. तेव्हां राणी साहेब प्रसूत होईपर्यंत जो कांहीं अवकाश आहे त्यांत आपल्यास जें कांहीं करून घ्यावयाचें तें करून घेतले पाहिजे असे मल्हारराव यांस वाटल्यावरून त्यांच्या एकंदर दहा किंवा पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत जे कांहीं त्याणी आपल्या मंडळीस दिलें असतें तें त्याणी सहा महिन्यांच्या कारकीर्दीत देऊन टाकिलें. मंडळीस सनदा करून देण्याची त्वरा, व त्यांत विलक्षण रीतीच्या शपथा लिहिण्याचा नवीन प्रचार व नेमणुकीप्रमाणें तिजोरींतून त्यांच्या पदरी पैसा घालण्याची उतावळ, अशा पुष्कळ गोष्टीं- वरून जमनाबाई साहेब यांस पुत्र होऊन आपल्या हातांतून राज्यकारभार गेला तरी आपल्या मंडळीस त्यांच्या चरितार्थांची जन्मपर्यंत अडचण पडूं नये हाच उद्देश मनांत धरून महाराजानी आपल्या मंडळीस उदारपणे देणग्या व मोठमोठ्या नेमणुका करून दिल्या होत्या असे वाटतें. दोष दृष्टीने पाहिले असतां महाराजानी राजधनाचा विनियोग करण्यांत अति अविचार केला हे खरे आहे, परंतु दुसऱ्या रीतीने पाहिले असतां या संबंधाने ते प्रशंसेस देखील पात्र आहेत. आपल्या आश्रित जनांविषयीं त्यांस मोठा अभिमान होता. त्यांस स अनुकूळ करून द्यावी अशी त्यांची फार इच्छा होती. त्यांच्या कल्याणासाठी त्याणी आपली भावी स्थिति काय होईल याविषयों कांहीं देखील परवा केली नाहीं. ते लोक