पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (९९) मनुष्यास महाराजांनी दिवाण नेमिला असता त्याच्या हातून राज्यामध्ये टिकाऊ सु- धारणूक होणार नाही. कर्नल फेर यांच्या रिपोटीतील समय मजकूर वर लिहिण्यांत आला आहे. यामु ळे विस्तार फार झाला आह असे दिसतें. परंतु तसे केल्यावांचून त्यांच्या यथार्थ गुणांचें प्रकटीकरण होणार नाही यासाठी व महाराजांस व दादाभाईस ते अतिशय प्रतिकूळ आहेत हे समजल्यावर देखील त्यांस त्या हुद्यावर कायम ठेविण्यांत, किती चक झाली हे दाखविण्यासाठीं तितक्या विस्ताराची गरज आहे असे मला वाटतें. मुंबई सरकारांनी कर्नल फेर यास तारीख १६ आगष्ट सन १८७४ रोजी पत्र. लिहिले त्यांत त्यांनी त्यास अशी सूचना केली की गवरनर जनरल यांनी दादाभाई- विषयीं कांहीं एक लिहिले नाही. त्यावरून अशी सहज कल्पना करण्यासारखे होतें कीं त्यांस महाराजांनी दिवाणागरीवर ठेविले असतां इंडिया सरकारची त्यांत हरकत नाहीं, असे असतां तुझीं त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही याबदल आम्हांस फार वा. ईट वाटतें. दादाभाई आणि काजी शाहाबुद्दीन यांनी आजपर्यंत जे काम केले. त्यावरून तुझांस आशा नाहीं कीं अवश्य कर्तव्यकार्य त्यांजपासून घडेल; परंतु सर. कारास माहीत आहे कीं गवरनर जनरल यांनी ज्या लोकांविषयीं हरकत घेतली ते सर्व लोक अधिकारावर होते आणि त्यांनी दादाभाई आणि काजी शाहाबुदीन यांचे किती विचार निष्फळ केल असतील ते काही कळून येणार नाही. अनुभव नाहीं या अपवादास दादाभाई पात्र आहेत; परंतु काजी शाहाबुद्दीन यांजविषयी पुष्कळ ठिकाणी चांगले मत आहे. आणि त्यांस अनुभव नाहीं अथवा काम करण्याची श कि नाहीं असें ह्मणवत नाहीं. यासाठी महाराज त्याच लोकांस कामावर कायम ठे.. वितील तर सरकार काही हरकत करूं शकत नाहीत. सरकार तुम्हांस वेळोवेळीं जे हुकुम देतील त्यांला विरोध येईल अशी सला देणें जेव्हां अगत्य असेल तेव्हां पूर्वी सरकारचा विचार घेतल्यावांचून तुझी कोणतीही सला देऊ नये. तारीख २४ आगष्ट सन १८७४. * रोजी मुंबई सरकारांनी दुसरे एक पत्र कर्नल फेर यांस पाठविले त्यांत दादाभाईच्या संबंधाने काही मजकूर आहे.. पांचवे कलमांत असे लिहिले आहे कीं, दादाभाई यांस दिवाण नेमण्याविषयीं तु, ह्नीं गायकवाडाजवळ आणि त्यांच्या काही कामगारांजवळ हरकत घेतली आणि त्याचप्रमाणे तुझी, त्यांस लष्करी मान देऊ नये, आणि कोणत्याही रीतीनें त्यांच्या दि वाणगिरीस अनुमत देऊ नये असे सरकारास आग्रहपूर्वक लिहिले तें वाचून गवरनर साहेब आणि त्यांचे मंत्री यांस अतिशय ताज़ूब वाटलें. तुझाला अगदी असंदि ग्ध शब्दानें कळविण्यांत आले आहे कीं, दिवाण पसंत करण्याचे कामांत गायक- वाढास हरकत करण्याचा सरकारचा अगढ़ीं इरादा नाहीं, फक्त त्यांच्या पसंतीचा परिणाम काय होतो तो पहावयाचा आहे. त्या हुकुमाकडेस अगदीं अलक्ष करून.. ब्ल्य बुक नंबर ४ पान ३५ पहा.