पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९८ ) मल्हारराव महाराजे गायकवाड यांचा खरा इतिहास. • याप्रमाणें दादाभाईविषयीं आपणांस अनुभव आहे, यास आपण लष्करीमान दिला "आणि दिवाणगिरीच्या हुद्यावर कायम ठेविण्याविषयीं अनुमति दिली तर सुधारणा करण्या विषयीं आपण ज्या सूचना केल्या आहेत त्यांस, आपल्या स्वतःच्या हितास, आणि त्याचप्रमाणे आपल्या अब्रूस आणि दरज्यास ही गोष्ट अगदीं विध्वंसक होईल. आपले कर्तव्यकर्म हैं आहे की महाराजांस आपण बजावून सांगितले पाहिजे कीं, जो वाईट मसलत देणारा ठरला आहे व ज्याचें राज्यामध्ये अगदीं वजन नाहीं अशा मागील पृष्ठावरून पुढे चालू. सिडेंट माहेब यांनी ती यादी दरबारति परत पाठवन सूचना केल्याबरोबर त्या शब्दांत आदला- बदल केली होती. गायकवाड सरकार सूचनेप्रमाणे त्या शब्दात फेरबदल करितात की नाहीं याची वाट पाहून मग जरूरीप्रमाणे मुंबई सरकारापर्यंत ही गोष्ट न्यावयाची होती; परंतु कर्नल फेर यस इतका धीर कोठचा ! त्यांनी महाराजांवर असा आरोप आणिला की, नानासाहेब खानवेलकर यांस प्रतिनिधित्व देण्याविषयों मी त्यांस हरकत केली, त्याबद्दल राग मनांत धरून त्यांनी माझा अपमान करण्यास सुरुवात केली. मुंबई सरकारांनी ही तसेंच गृहीत करून दर- बारांनी त्या शब्दांत फेरबदल केली किंवा नाही याबद्दल रेसिडेंट यास काळजीपूर्वक विचारले आणि त्या शब्दांत फेरबदल केली असे त्यांनी त्यांस कळविले तेव्हा त्यांचे मन शांत झालें. एका " कर्नल फेर यांनी महाराजाशी पत्रव्यवहार केला त्यांत अनेक ठिकाणी अप्रयोजक शब्दा- चा उपयोग करून त्यांचा बुद्धिपुरस्सर अपमान केला होता व त्याबद्दल महाराजांनी ग्वलित्यांत मुंबई सरकारास फिर्याद ही केली होती; परंतु त्याजकडे त्यांनी तिळमाल ही लक्ष दि- लें नव्हतें. “आपण ” या शब्दाऐवजी "तुम्ही " हे शब्द चुकून पडले असता कर्नल फेर यांनी इतका कलकलाट केला आणि मुंबई सरकारांनी देखील तसेच गृहति करून रोसडेंट साहेब यसि असे उत्तर पाठविलें कीं, निःसंशय गायकवाडांनी “तुम्ही " हे शब्द यादीत लिहून तुमचा अपमान केला आहे, यास्तव ते शब्द दुरुस्त करण्याविषयों तुम्ही गायकवाडस सूचना केली त्या- चा परिणाम काय झाला तो आझास कळवा. जेथें कर्नल फेर यांचा इतका पक्षपात होता आ णि चुकीने घडलेल्या सामान्य गोटीबद्दल देखील जेथं क्षमेचा लेश ही उरला नव्हता तेथे दादाभा- ई यांनी करावे काय आणि राज्यकारभार चालवावा तरी कसा !!! बरें असो, ही तर चूक तरी झाली होती पण " आपण मला मोकळया मनाने लात देण्यास उत्सुक आहोत याबद्दल मी आपला आभारी आहे आणि जरूर पडेल तेव्हा मोठया आनंदानें आपली सल्ला मसलत विचारीन " असे महाराजांनी लिहिले होतें यांत त्यांनी तो काय अपराध केला होता !! “दादाभाई हे आपली व आपल्या यजमानाची माझ्या सल्लामसलतीपा- सून सुटका करून घेण्याचा यत्न करीत आहेत असा कर्नल फेर यांनी त्या वाक्याचा अर्थ करावा असे त्यांत कांही तरी आहे काय ? कर्नल फेर यांच्या इच्छेप्रमाणे "तुमची सल्ला मस लत घेतल्यावांचून भी कांहीं एक करणार नाहीं " असे त्या यादीत शब्द पाहिजे होते आणि ते त्यात नव्हते ही गोष्ट मात्र खरी आहे !! “आपण माझ्या सहयाविषयी अनपेक्षित असला तरी मी आपल्यास सल्ला देणार" हें कर्नल फेर यांचें महाराजांच्या यादीवर उत्तर !! मुंबई सर- कारांनी देखील कर्नल फेर यांस या उत्तराबद्दल टपका दिला. ते त्यांस म्हणाले कीं, “तुम्हांस गायकवाडांनी यापेक्षा चांगले असें दुसरे ते काय लिहावयाचे होते. गायकवाडांनी तरी या बद्दल त्यांचा आभारच मानिला पाहिजे होता. नाहीं तर त्यांनीं असे म्हटले असते कीं, खरो- खर गायकवाडांच्या मनात रोसडेंटाची सल्ला घ्यावयाची नाहीं ह्मणून ते असे लिहितात, तर तेथे मल्हारराव महाराज यांचा व त्यांच्या नव्या दिवाणाचा काय इलाज होता !! " गुणाच्याठायी जो दोषारोप करण्यास चुकत नाहीं, तो दोष घडला असतां क्षमा करणार नाही ही गोष्ट मुंबई सरकारांनी ध्यानात घेऊन कर्नल फेर यस ऐसिडेंटच्या हुरून दूर करण्या- चा तो योग्य समय होता.