पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (९७) भाई आणि त्यांचे साथी यांनी बडोदें सोडून जाण्याचें महाराजांस भय घातले. त्या बदल महाराजांनी माझा विचार घेतला तेव्हां मी तात्काळ त्यांस सांगितले की दा दाभाई यांस जाऊं द्या. महाराज आपले ऐकत नाहीत असे दादाभाई यांस वाटले तेव्हां त्यांनी महाराजांचा अती आवडता तो प्रसिद्ध दामोदरपंत भडवा आपल्या मसलतीत घेतला. * आणि त्यायोगानें दादाभाई आणि त्यांचे साथी यांस महाराज अनुकूल झाले हा अनिष्टकारक परिणाम घडून आला. नानासाहेब खानवेलकर आणि दुसरे कामदार यांस कामावरून दूर करण्याविषयीं भी महाराजास सला दिली तो लागलींच नानासाहेब यांस प्रतिनिधी कबूल कर ण्याविषयों मला आग्रहपूर्वक विनंति केली. ज्या मनुष्यास गवरनर जनरल यांनी एका हुद्यावरून काढून टाकावले त्या मनुष्यास त्याहून जास्त सन्मानाचा अधिकार देण्याविषयीं इच्छा प्रदर्शित करणें ही गोष्ट ब्रिटिशसरकारास अपमानकारक होय. हा प्रयत्न शेवटास गेला नाही तेव्हां दादाभाई यांनी मला नंबर १४३४ची या- दी लिहिली. त्याविषयों मीं सरकारास रिपोर्ट केला आहे. त्यांत ते रेसिडेंट यांचा कसा अपमान करीत आहेत आणि रेसिडेंटाच्या मसलतीपासून आपली आणि म हाराजांची सुटका करून घेण्यासाठी ते कसा प्रयत्न करीत आहेत याविषयीं खुला- सेवार सांगितले आहे. “Dalabhai upon this took into his counsels the notorious Damodur Punt, the present favourite of the Gaikwar, the panderer to his grossest vices, the oppressor of women, and the unfortunate result has been that the Maharaja deci led in favour of Mr. Dadabhai and his party." ( Blue book No. 4 Page32.) + नानासाहेब खानवेलकर यांस महाराजांनी प्रतिनिधित्व दिले तर तेणेंकरून ब्रिटिश सरकारचा अपमान होईल है कर्नल फेर य:चें ह्मणणे त्यांच्या नेहमीच्या सांप्रदायाप्रमाणे लावा- लावीचें होतें व तुझी नानासाहेब यांस प्रतिनिधित्व देऊ नका असा अधिकाराच्या नात्यानें मं- हाराजांस निषेध करणेही वाजवी नव्हते. पण महाराजांस मित्रभावानें सल्ला मसलत देतांना “आपण ही गोष्ट केली असता लौकिकांत चांगली दिसणार नाही" असे देखील रोसडेंट साहे- ब यांनी महाराजास सांगू नये की काय ? ज्या मनुष्याच्या दिवाणगिरीत राज्यामध्ये येवढा मोठा घोटाळा झाला होता त्या मनुष्यास राष्ट्राच्या खजिन्यातून मोठी नेमणूक देऊन अत्युच्च पदावर चढविणें है महाराजांचें वर्तन समंजसपणाचें नव्हतें, सबब त्यसि ब्रिटिश सरकारच्या अधिका- ज्यांनी आपली कोणत्याही प्रकारची अनुमति देऊन त्याबद्दल महाराजसि उत्तेजन येईल असें काही एक करावयाचं नव्हतें आणि इतक्या पुरतें कर्नल फेर यांचं ह्मणणें अगदों रास्त आणि आम होतें. + तारीख १४ आगष्ट सन १८७४ नंबर १४३४ ची दरबारातून रोसेंडेंट साहेब यांस एक यादी पाठावली होती त्या संबंधों है कलम आहे. 39 त्या यादींत "आपण या सर्वनामाच्या ठिकाणों "तुझी' या पुरूषवा. चक सर्वनामाचा उपयोग केला होता. त्या यादीतील विषयास अनुसरून आणखी असे लिहि- लें होते की, “आपण मला मोकळ्या मनानें सल्ला मसलत देण्यास उत्सुक आइति याबद्दल मी आपला फार आभारी आहे, आणि गरज पडेल तेव्हा मोठया आनंदानें आपली सल्ला मसलत घेण्यात येईल.” “आपण" या शब्दाऐवजी "तुझी " हा शब्द लिहिण्यांत केवळ चूक झाली त्याच यादीत पुष्कळ ठिकाणी " आपण या शब्दाचा देखील उपयोग केला यावरून " तुम्ही या शब्दाचा बुद्धिपुरःसर उपयोग केला नव्हता है स्पष्टच होतें; आणि रे- हाती. 13 होता १०