पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९६) मल्हारराव महाराज गायकवाड याचा खरा इतिहास. कारण आहे कीं ते आणि त्यांचे साथी राज्यकारभार चालविण्यास अगदीं असमर्थ आहेत. मीं सन १८७३ च्या एप्रिल महिन्यापासून वारंवार कळविले आहे कीं, सन १८७२च्या अखेरीपासून ह्मणजे गायकवाडाने शिरजोरपणा करून व्हाइसराय साहेब यांच्या दरबारास येण्याचें नाकबूल केले तेव्हांपासून दादाभाई हे महाराजांचे मुख्य सलागार आहेत. हिंदुस्थानांतील देशी राजांपैकी एकाने दरबारास येण्याचें नाकबूल केल्यामुळे त्या वेळेस राजकीय संबंधाने फार वाईट परिणाम झाला आहे आणि अद्यापही पुष्कळाच्या ध्यानांत ती गोष्ट राहिली आहे. याविषयों कांहीं सं- शय नाही; आणि तेव्हापासून मल्हारराव महाराज यांचे आचरण फार वाईट झाले आहे. त्यानंतर दादाभाई यांनी महाराजांस अग्रगण्यतेबद्दल खलिता लिहून देऊन आणि नानाप्रकारची निमित्ते दाखवून आपल्यास इंग्लंडांत एजंट नेमिण्याविषयीं त्या निर्बळ मनाच्या राजाचे मन वळविलें. दादाभाई यांनी महाराजांची चांगली चाकरी केली या निमित्ताने रुपये ५०००० पन्नास हजार मिळवून ते इंग्लंडास गेले आणि गेल्या डिसेंबर महिन्यांत परत आले तेव्हांपासून ते येथे आहेत. तारीख २४ डिसेंबर सन १८७३ पासून या वेळपर्यंत दादाभाई यांनी बडोद्या- चे दिवाण या नात्यानें जें कांहीं काम केले त्याबद्दल मीं रिपोर्ट केले आहेत. या काळामध्ये त्यांनी कितीएक खळिते लिहिले त्यांत लक्ष्मीबाईच्या कामांत जे लि- हिळे त्यांजमध्यें तर पूर्ण पुरावा आहे कीं बडोद्याची दिवाणागिरी करण्यास ते अग- दीं नालायक आहेत; आणि त्याखेरीज आणखी दुसरी प्रमाणे आहेत तीं ह्रीं:- कमिशनांनीं ज्या शिफारसी केल्या आहेत त्या अमलांत आणण्यास आठ महिने झाले अगदी टाळाटाळी करण्यांत येत आहे, ब्रिटिश सरकारच्या रयतेविषयों अ न्याय वाढत चालला आहे, बडोद्याच्या रयतेवर जुलम चालले आहेत, ब्रिटिश स रकारची वाजवी हक्काची सर्व मागणी नाकबूल करण्यांत येत आहेत, आपल्या व्या- पाराला नुकसान केले आहे, आणि अफूच्या एका मुकदम्यांत रेसिडेंट यांचा प्रत्यक्ष रीतीनें अपमान केला आहे, आणि त्याखेरीज आपण ज्याविषयों उपेक्षा केली आहे असे पुष्कळ मुकदमे आहेत. आपल्यास असे वाटले कीं, कमिशनच्या रि- पोर्टावर गवरनर जनरलचा ठराव होऊन आल्यावर कांहीं चांगल्या गोष्टी घडतील. गवरनर जनरलचा खलिता मीं तारीख ३ माहे मजकूर रोजीं महाराजांस दिला परंतु त्यापासून कांहीं चांगला परिणाम होण्याचें चिन्ह दिसत नाहीं. दादाभाई यां- नीं त्या खलित्यांत ज्या कांहीं सला दिल्या आहेत त्यांचा आपणांस फायदा करून घण्यासाठी काही वेळपर्यंत बडोद्याची राषद महाराजांनी आपल्या हवालीं करावी याबद्दलच्या दस्तऐवजावर महाराजाची सही घेण्याकरितां प्रयत्न केला. मला अ से कळविण्यांत आहे कीं महाराजांनी ती गोष्ट नाकबूल केली तेव्हां दादा-