पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (९५) जें कांहीं काम करावयाचे आहे त्याचें काठिण्य मनांत आणितां माझा असा निश्चय झाला आहे की, आपल्या जिल्ह्यांतील पहिल्या प्रतीचे आणि कामांत कस- लेले कांहीं लोक राज्यकारभारांत घेण्याविषयी जर मी महाराजांचे मन वळवूं श कणार नाही तर राज्यामध्ये खरी सुधारणूक होणार नाहीं.. मी महाराजास असे सांगितले की दादाभाईविषयीं मीं माझा अभिप्राय स्पष्ट पणें खानगी रीतीनें वदवून दाखविला आहे, तो आपण त्यांस खुशाल सांगावा आणि ते जर रेसिडेन्सींत आले तर मीही हल्लींच्या अव्यवस्थित राज्यव्यवस्थेबद्दल आपल्या सजीं कारणे सांगितलीं आहेत तीं त्यांस सांगून प्रधानगिरी करण्यास ते लायक नाहीत याविषयीं जो माझा दृढ निश्चय झाला आहे तो मी त्यांस कळवीन. असा कर्नल फेर यांच्या रिपोर्टातील एकंदर सारांश आहे. गवरनर जनरलच्या खलियावरून महाराजांस पक्के समजले होते की दिवाण ने- मण्याचा आपणास स्वतंत्र अधिकार दिला आहे, यासाठी रेसिडेंटाचें जर ऐकिलें नाहीं तर त्यासंबंधाने त्यांचें कांहीं चालणार नाहीं; सबब त्यांनी बापुभाई आणि गोविंदराव मामा यांजबरोबर त्यांस असे सांगून पाठविलें कीं, दादाभाई यांस मीं विलायतेहून बोलावून आणिले आहे, तेव्हां आतां त्यांस रजा देणें चांगलें नाहीं. या- साठीं त्यांस दिवाणगिरीचें हुद्यावर ठेवू नये असे आपल्या मनांत आहे तर त्याबद्दल एक दरबारांत यादी लिहावी, ह्मणजे ती त्यांस दाखवून लागलींच रजा देण्यांत येईल. येथे रेसिडेंट साहेब यांची लटपट झाली. त्यांनी सांगितले की, आमची खानगी सला आहे की त्यांस दिवाणगिरीवर ठेवू नये. सरकारी रीतीने आह्मी यादी लिहू शकत नाही. कामदारांनी प्रत्युत्तर दिले की तर मग दादाभाई यास दिवाण नेमि- ल्याबद्दल दरबारांतून आपल्याकडेस आज यादी येईल. त्याप्रमाणे तारीख १४ आगष्ट सन १८७४ रोजीं दरबारांतून यादी लि- हिली कीं, दादाभाई यांस दिवाण नेमिलें आहे, यासाठी त्यास शिरस्त्याप्रमाणे लष्क- री मान द्यावा. तारीख १५ आगष्ट सन १८७४ रोजी कर्नल फेर यांनी नंबर चा मुंबई सरकारास एक दुसरा रिपोर्ट केला त्यांत त्यांनी खाली लिहिल्याप्रमाणें लि हिलें होतें. २९१ ८६५ सन १८७२च्या अखेरीपासून बडोद्याचे राज्याशीं दादाभाईचा संबंध आहे तेव्हांपासून ब्रिटिश सरकाराविषयीं जे त्यांचे वर्तन आहे त्याकडे लक्ष देतां त्यांस दिवाणगिरीच्या हुद्यावर कायम ठेविण्याविषयी कायदेशीर रीतीनें अनुमति देण्यांत आपण आपल्यावर एक मोठी जबाबदारी ओढून घेतो. मागील आठ किंवा नऊ महिन्यांमध्ये ज्या गोष्ठी घडून आल्या आहेत त्यांवरून आपणांस असे मानण्यास ब्ल्यू बुक नंबर ४ पान ३१ पहा.