पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. असें साधारण विचाराच्या मनुष्यास देखील कळण्यासारखे होते; पण रेसिडेंट सा- हेब यांस त्याबद्दल काहीं गैराशस्त वाटले नाही. महाराजांसच नुसती धमकी दे ऊन ते थांबले नाहीत. त्यांनी मुंबई सरकारांस देखील अगदी निक्षून शिफारस के ली की त्यांनी दादाभाई यांस दिवाणगिरीवर नेमूं देऊं नये.

तारीख ११ आगष्ट सन १८७४ रोजीं नंबर २४७-८४४ चा त्यांनी मुंबई स रकारांस रिपोर्ट केला त्यांत त्यांचें ह्मणणे असे होते कीं महाराज यांनी त्यांच्या कामदारांच्या द्वारे माझा विचार घेतला कीं, दादाभाई व त्यांचे साथी यांस मीं कामावर ठेवावें किंवा नाहीं. महाराज दादाभाईपासून सुटका करून घेण्याविषयी फार दिवस इच्छीत आहेत, परंतु त्यांचे विलायतेमध्यें वजन आहे आणि ते आपला बद- लौकिक करतील याचें महाराजांस भय वाटतें. महाराजांनी सर्व राज्य आपल् स्वाधीन करावे यासाठी दादाभाई यांनी पंचवीस कलमांची यादी तयार केली आहे असे मला कळलें आहे आणि ही बातमी खरी आहे. जुन्या कामदारांनी तसे न करण्याविषयीं महाराजांचें मन वळविले आहे व मींही त्यांस असे आश्वासन दिलें आहे कीं, दादाभाई काम सोडून गेले असतां मी कांहीं अडचण पडूं देणार नाही. परंतु दादाभाई आणि त्यांचे सोबती यांनी गवरनर जनरलच्या खलित्यानें महाराजांवर जी जबाबदारी आली आहे त्याबद्दल भय घातल्यामुळे काय करावें तें महाराजां सुचत नाही. माझा विचार घेतला तेव्हां मीं निश्चयपूर्वक माझें मत दिलें कीं, दादाभाई आणि त्यांचे साथी यांजमध्ये राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान व बुद्धि नाहीं, त्यांस अनुभव नाहीं, आणि साधारण लोकांपासून सरदारांपर्यंत त्यांजवर कोणा- चाही विश्वास नाहीं. नऊ महिने दादाभाई आणि पांच महिने काजी शाहबुद्दीन काम करीत आहेत त्यावरून मला अशी आशा नाहीं कीं त्यांच्यानें राज्यकारभार हाईल. ब्रिटिश सरकारावांचून महाराज आपली राषद दुसऱ्या कोणाच्या हवाली करण्याबद्दलच्या दस्तऐवजावर सही करतील तर त्या संबंधानें दादाभाईचें कृत्य हा ब्रिटिश सरकारच्या सार्वभौम अधिकाराविरुद्ध एक अपराध आहे असे मानून मी त्याबद्दल खूप लक्ष देईन. दादाभाई व त्यांचे मित्र यांस माझ्या अभिप्रायाबद्दल राग येईल हें स्वाभाविक आहे; परंतु हल्लींच्या आणीबाणीच्या प्रसंगी मला असे वाटते की प्रमाणिकपणाने जे मला खरें दिसेल तें मीं सांगावें. मग ते महाराज ऐकोत अगर न ऐकोत. मनु- घ्यावांचून अडत असेल तर माझे नेटिव असिस्टंट मणीभाई त्यांस बापुभाई- बरोबर जाईंट कारभाऱ्याचे काम करण्यासाठी देण्यास मी सिद्ध आहे असें मीं म- हाराजांस सांगितले. दादाभाई यांनीं जी कलमबंदी तयार केली आहे त्याजवर जर महाराजांनी सही केली नाही, तर आपण काम सोडून जाऊं असे ते महाराजांस भय घाळतात त्याप्रमाणे ते गेले तर मणीभाईच्या योगाने हल्लींपेक्षा देखील दिवाणगिरी - चें काम जास्त चांगलें चालेल. ब्ल्यू बुक नंबर ४ पान २३ पाहा.