पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. ( ९३ ) दाभाईमध्ये नाहीं हें त्यांस स्पष्ट कळले होते. यासाठी त्यांनी महाराजांस भय घा- तलें कीं, दादाभाई यांस जर तुझी दिवाण नेमाल तर माझे व तुमचें सूत्र कधीही जमायाचें नाहीं. याविषयों खालीं लिहिलेली प्रमाणे आहेत. महाराजांचे लग्नात रेसिडेंट यांनी अपमान केल्याबद्दल दादाभाई यांनी महारा- जांस खलिता लिहून दिला त्यांतील कांहीं शब्दांच्या अर्थाविषयीं तारीख ११ मे सन १८७४ रोजी कर्नल फेर साहेब यांनी रावसाहेब बापुभाई आणि गोविंदराव मामा यांजजवळ वाटाघाट केली. ते त्यांस असे ह्मणाले की 'आह्मांस दुष्मन ठरविलें आहे आणि इंग्रज सरकाराबरोबर लढाई सुरू केली आहे. आह्मी तुम्हांस सांगितलें होतें कीं दोन्हींतून एक मार्ग धरा. दादाभाईच्या धोरणाने चाला, किंवा. माझ्या धो- रणाने चाला. जसें बीज पेराल तसे फळ मिळावयाचे.' तारीख १३ मे सन १८७४ रोजी सदरील कामदाराजवळ रेसिडेंट साहेब यां नीं पुन: दादाभाईवर गोष्ट आणिली. ते त्यांस ह्मणाले की 'दादाभाईनें खलित्या- त जो शब्द लिहिला आहे त्याचा अर्थ करून दाखवावा लागेल. पंधरा दिवसांत काय होतें तें पहा. गेल्या सोमवारी दादाभाईने महाराजांस मला भेटण्यासाठीं येऊं दिले नाहीं; पण ही तक्रार इंग्रजसरकारच्या बरोबरची आहे, हलकी समजू नका. आ ह्मीं तुझांस सांगितले आहे की एक आमचा, व दुसरा दादाभाईचा रस्ता आहे. त्या- चा विचार करा.' तारीख १५ आगष्ट रोजी कर्नल फेर सदरील कामदारास असे ह्मणाले कीं 'एकी कडेस दादाभाई,*मंगेश, +वाडिया आणि काजी हे चार आणि दुसरीकडेस मी, गवरनर साहेब आणि गवरनर जनरल हे तिघे. आमच्या इमारतीचा पाया दगडावर आहे त्यांच्या इमारतीचा पाया रेतीवर आहे. कोणाची इमारत पडेल हें ध्यानांत घेण्याविषयीं तुझा महाराज साहेब यांस सांगा.' तारीख १८ आगष्ट सन १८७४ रोजी मुंबईस जातांना साहेब आणखी त्या कामदाराजवळ असे बोलले की 'नऊ महिन्यांत दादाभाईच्याने काही झाले नाहीं, तें आतां काय होणार ? अरेवर महाराजांचे नुकसान व्हावयाचे आहे.' वर जे उतारे दिले आहेत ते रावसाहेब बापुभाई दयाशंकर यांनीं गुजराथी भाषेत रोजनिशी लिहून ठेविली आहे त्यांतील आहेत. महाराज यांनी दादाभाई यांस दिवाण नेमले तर आपल्याच्याने जितकें करवेल तितकें महाराजांचे नुकसान करूं असा कर्नल फेर यांच्या वरील भाषणाचा इत्यर्थ आहे. गवरनर जनरल यांनी महाराजांस दिवाणाची नेमणूक करण्याविषयीं स्वतंत्र अ धिकार दिला होता; सबब त्याविषयीं महाराजांस हरकत करणें अगदीं गैर होतें + होरमजजी वाडिया. बाळा मंगेश वागळे. + शाहाबुद्दीन काजी.