पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १६. कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. आणि - नानासाहेब खानवेलकर यांस प्रतिनिधी व दादाभाई नवरोजी ग्रांस दिवाण नेमण्याविषयीं कर्नल फेर यांची हरकत त्या संबंधानें मुंबई सरकाराशी पत्रव्यवहार करण्यांत त्यांचा अप्र- योजकपणा – त्याविषयों मुंबई सरकारानी निर्भर्त्सनापूर्वक त्यांस टपका दिला असतांही त्याविषयी त्यांची अनुतापविमुखता स्वच्छंदानुवर्तित्व - महाराजानीं नानासाहेब खानवेलकर यांस प्रतिनिधी आणि दादाभाई यांस दिवाणाचा अधिकार दिला कर्नल फेरयां दादाभाईची प्रतिकूलता असल्यामुळे दादाभाई यांच्या कारभारांची दुर्दशा-इंग्रज सरकारच्या चाकरींतील काम- दार लोकांस बडोद्याच्या दरबारांत पाठविण्याविषयीं मुंबई सरका- रचें पराकाष्ठेचें दुर्लक्ष – त्या संबंधानें हिंदुस्थानसरकार आणि मुंबईसरकार यांजमध्ये कडाकडीचा पत्रव्यवहार - चंदरराव कडू यांचा पक्ष धरून सरदार व शिलेदार लोकांनी महाराजांचे स- तेचा तिरस्कार केला असतांही कर्नल फेर यांचा महाराजांच्या स त्तेस अपायकारक स्तब्धपणा कर्नल फेर यांस रोसेडन्सीच्या - हुद्यावरून काढण्याविषयीं गवरनर जनरल यांस महाराजांची प्रार्थना - त्यांत त्यांचें साफल्य - मुंबईसरकारचा कर्नल फेर वि षयीं पक्षपात आणि दुराग्रह- त्यांत त्यांचा पराजय - - - महारा- जांच्या राज्यकारभारावर पुन्हां नवे नवे भयंकर आरोप स्थापित करण्याचा कर्नल फेर यांचा प्रयत्न त्यांच्या व मुंबई सरका रच्या वर्तनाचें गुणदोषविवेचन. - - - गवनर जनरल यांनी मल्हारराव महाराज यांस राज्यांत सुधारणा करण्याकरितां अठरा महिन्यांची अवधि दिली आणि त्यांचें स्वातंत्र्य कायम ठेविलें ही गोष्ट कर्नल फेर यांच्या पसंतीस आली नाही. त्यांचा काय तो यत्न आपणास राज्यकारभारांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार असावा हा होता. आणि तो तर सफळ झाला नाहीं, तेव्हां ते महाराजांस आणि दादाभाई यांस विशेष प्रतिकूळ होऊन बसले. त्यांस बडोद्याचा दिवाण अगदीं निजतंत्रानुवर्ती पाहिजे होता आणि तो गुण दा